आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायपूरच्या सिलतरा भागात गुरुवारी एका अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला. बुलडोझरचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. मृत मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील होते. स्टील प्लांटमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या अपघाताची दाहकता दिसून येत आहे. त्यात मजुराच्या हाताच्या अक्षरशः चिंधड्या झाल्याचे दिसून येत आहे.
हा अपघात धनकूल स्टील नामक प्रकल्पात झाला. लोडिंग सारख्या कामांसाठी येथे नेहमीच बोलडोझर मागवले जाते. तिथे त्याच्या टायरमध्ये हवा भरली जात होते. प्रेशर वाढल्याने टायरचा अचानक स्फोट झाला. त्यात हवा भरणारे राजपाल सिंह व प्रांजल नामदेव जबर जखमी झाले.
दोन्ही मजुरांचे डोके फुटले
टायर फुटल्यामुळे दोन्ही मजुरांचे डोके फुटले. त्यात रक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. स्फोटावेळी अजूनही काही कर्मचारी उपस्थित होते. स्फोटानंतर पळून जाऊन त्यांनी आपले प्राण वाचवले. पण, राजपाल व प्रांजल यांना अशी संधी मिळाली नाही. या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेजही उजेडात आले आहे.
5 फूट हवेत उसळले
दोन्ही कर्मचारी बुलडोझरचे टायर खोलून त्याच्यावर बसून हवा भरत होते. एका कर्मचारी हवा भरत होता. तर दुसरा टायरचे प्रेशर पाहत होता. पण, दोघांनाही नेमके प्रेशर समजले नाही. त्यामुळे अचानक प्रेशर वाढून टायर फुटले. यामुळे राजपाल व प्रांजल जवळपास 5 फूट उंच हवेत उडाले. टायरच्या मध्यभागी असणारी लोखंडी रिंग त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे ते खाली पडले.
सिलतरा पोलिसांकडून घटनेची चौकशी
सिलतरा पोलिसांकडून या घटनेत बळी गेलेले दोन्ही मजूर मध्य प्रदेशच्या सतनाचे रहिवाशी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या कुटूंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले गेले आहेत. पोलिस घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीचा तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.