आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नशेची लाइफलाइन:दोन लाख लोक एका गोळीसाठी रोज लावतात रांगा, यात तरुणासह वृद्ध व महिलाही

जालंधर : हरपाल रंधावा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाबमध्ये नशेवर उपचार घेणाऱ्यांची संख्या लाखाने वाढली

पंजाबच्या ओट (आऊटपेशंट ओपियाड असिस्टेड ट्रीटमेंट) सेंटरमध्ये दररोज दोन लाख लोकांची रांग दिसून येते. या लोकांना बुप्रेनॉर्फिन/नालोक्सोनची गोळी देण्यात येते. ही धोकादायक नशेला पूरक गोळी आहे. मात्र, हळूहळू नशा सोडण्यास मदत होते. सरकारी आकडेवारीनुसार, संचारबंदी व लॉकडाऊन काळात पंजाबमध्ये १.०२ लाख लोकांना हेरॉइन (चिट्टा), पोस्त, स्मॅक, नशेच्या गोळ्या व कॅप्सूल्स घेणे सोडण्यासाठी ओट सेंटरमध्ये नोंदणी केली आहे. हे लाेक दररोज सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत रांगेत उभे राहून गोळी घेतात. मग तळपत्या ऊन-पावसाचीही ते पर्वा करत नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये ५.४१ लाख नशेबाज तरुणावर उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे २५ वर्षीय तरुणीही घेत आहेत उपचार
पंजाबमध्ये पुरुषच नव्हे, तर महिलाही नशा करतात. यासाठी राज्य सरकारने कपूरथळा येथे २६ जून २०१८ रोजी पहिले सरकारी नवकिरण नशा मुक्ती केंद्र सुरू केले. येथे उपचारासाठी १५५ तरुणी नशेवर उपचार करवून घेण्यासाठी दाखल आहेत. यापैकी ८० मुलींची अवस्था इतकी गंभीर होती की, त्यांना नवकिरण केंद्रात भरती करण्यात आले.

आता ७ तरुणींवर उपचार सुरू आहेत. अन्य रुग्ण येथे दररोज गोळीसाठी येतात. धक्कादायक बाब म्हणजे १५५ मुलींमध्ये सर्वांचे वय २५ वर्षांहून कमी आहे. याचबरोबर वृद्ध महिलाही येथे उपचारासाठी येतात. या मुलींचे व्यसन सुटावे म्हणून शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. नशाविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे.