आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Months After The Corona Crisis, Reports Of The India's Highest income Temples

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:शिर्डी संस्थानने एफडी मोडून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले, तिरुपती देवस्थानाचेही दोन महिन्यांत सुमारे ४०० कोटी रुपयांचे नुकसान

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना संकटाच्या २ महिन्यांनंतर देशातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या मंदिरांचा वृत्तांत

(अनिरुद्ध शर्मा)

२२ मार्चच्या लाॅकडाऊनपासून देशातील सर्व मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांकडून दान जवळपास बंद आहे. यामुळे मंदिरांना बचतीतूनच खर्च भागवावा लागत आहे. देशातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या केरळमधील पद्मनाभ मंदिरात दरमहा सुमारे ३ कोटी रुपये दान स्वरुपात येत. मात्र, लॉकडाऊनमध्ये केवळ २५ हजार रुपये दान आले. वैष्णोदेवी मंदिरही खर्च भागवण्यासाठी अाता ऑनलाइन देणग्या स्वीकारण्याच्या पर्यायाचा विचार करत आहे.

सिद्धिविनायक, मुंबई : ऑनलाइन देणग्यांचा पर्याय असूनही उत्पन्न प्रचंड घटले

मुंबईत सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांत ९०% घट झाली. मंदिराच्या वेबसाइटवरील आकडेवारी, ताळेबंदानुसार मंदिराचे सुमारे १५० कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन व देखभालीसह सुमारे ६-७ कोटी रुपयांचा मासिक खर्च आहे. मंदिराचे वार्षिक उत्पन्न ४१० कोटी आहे. या हिशेबाने सरासरी २१-२२ लाख भाविक मंदिरात आलेच नाहीत.

साईबाबा संस्थान, शिर्डी : एफडी तोडून कर्मचाऱ्यांचे १५ कोटी रुपये वेतन दिले

शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानचे वार्षिक उत्पन्न सुमारे ७०० कोटी आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाइन देणग्या मिळाल्या. तर दानपेटीत या काळात सुमारे १०० कोटी रुपयांचे अपेक्षित दान आले नाही. मंदिराच्या ६ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिलचे वेतन देण्यासाठी एफडी तोडावी लागली. मंदिराकडे सुमारे २५०० कोटी रुपयांची एफडी आहे.

तिरुपती बालाजी, आंध्र प्रदेश : एफडीची रक्कम, सोन्याऐवजी पैशासाठी नवा पर्याय शोधणार

रोज सर्वाधिक देणग्या मिळणाऱ्या तिरुपती देवस्थानमला दरमहा सुमारे २०० कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. मंदिराच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन, देखरेख व सुरक्षेवर ११० कोटी रुपये महिन्याचा खर्च असतो. खर्च भागवण्यासाठी एफडी किंवा सोन्याऐवजी दुसरा पर्याय संस्थान शोधत आहे.

बातम्या आणखी आहेत...