आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Saints As Successors Of Shankaracharya Swaroopananda, Latest News And Update

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंदांना दिली गेली भू-समाधी:वैदिक मंत्रोच्चार व धार्मिक प्रथेनुसार देण्यात आला अखेरचा निरोप

नरसिंहपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष पीठ बद्रीनाथ व शारदा पीठ द्वारकाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती याना सोमवारी वैदिक मंत्रोच्चारासह समाधी देण्यात आली. साधू-संतांनी वैदिक प्रथा व धार्मिक विधींनी त्यांना समाधी दिली. तत्पूर्वी, भजन कीर्तनासह त्यांना पालखीत बसवून समाधी स्थळापर्यंत आणण्यात आले. तिथे हजारो भाविक व त्यांच्या शिष्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

स्वरुपानंद सरस्वती यांचे रविवारी दुपारी 98 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनी झोतेश्वर स्थित परमहंसी गंगा आश्रमात अखेरचा श्वास घेतला.

शंकराचार्य स्वरूपानंद यांची समाधीस्थळापर्यंत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.
शंकराचार्य स्वरूपानंद यांची समाधीस्थळापर्यंत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचे उत्तराधिकारी घोषित

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या उत्तराधिकाऱ्यांची नावे सोमवारी दुपारी घोषित करण्यात आली. त्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची ज्योतिष पीठ बद्रीनाथ व स्वामी सदानंद यांची द्वराका शारदा पीठाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावांची घोषणा शंकराचार्यांच्या पार्थीवापुढे करण्यात आली.

स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी झोतेश्वर स्थित परमहंसी गंगा आश्रमात दुपारी साडेतीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक नरसिंहपूरला आले होते.

ज्योतिष पीठाची सूत्रे सध्या अविमुक्तेश्वरानंद महाराजांकडे आहे. तर द्वारका पीठाचा प्रभार दण्डी स्वामी सदानंद सरस्वती यांच्याकडे आहे.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद (डावीकडे) यांची ज्योतिष पीठ बद्रीनाथ व स्वामी सदानंद (उजवीकडे) यांना द्वारका शारदा पीठाचे प्रमुख घोषित करण्यात आले आहे
स्वामी अविमुक्तेश्वरानंद (डावीकडे) यांची ज्योतिष पीठ बद्रीनाथ व स्वामी सदानंद (उजवीकडे) यांना द्वारका शारदा पीठाचे प्रमुख घोषित करण्यात आले आहे

परमहंसी गंगा आश्रमातील छायाचित्रे पाहा...

कमलनाथ अंत्यदर्शनानंतर म्हणाले - त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळाले.
कमलनाथ अंत्यदर्शनानंतर म्हणाले - त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मिळाले.
रविवारी सायंकाळपासून आश्रमातील शंकराचार्यांच्या गादीपुढे जवळपास 100 बटूक महाराज राम नामाचा जाप करत आहेत.
रविवारी सायंकाळपासून आश्रमातील शंकराचार्यांच्या गादीपुढे जवळपास 100 बटूक महाराज राम नामाचा जाप करत आहेत.
आमदार जयवर्धन सिंह माजी सीएम कमलनाथ व माजी केंद्रीय मत्री सुरेश पचौरी यांच्यासोबत आश्रमात पोहोचले.
आमदार जयवर्धन सिंह माजी सीएम कमलनाथ व माजी केंद्रीय मत्री सुरेश पचौरी यांच्यासोबत आश्रमात पोहोचले.
परमहंसी गंगा आश्रमत परिसरातील पेंडॉलपासून जवळपास 400 मीटर दूर शंकराचार्यांना समाधी देण्यात येणार आहे. यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे.
परमहंसी गंगा आश्रमत परिसरातील पेंडॉलपासून जवळपास 400 मीटर दूर शंकराचार्यांना समाधी देण्यात येणार आहे. यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे.
आश्रमापासून 2 किलोमीटर अगोदर झोतेश्वर गावाजवळ प्रशासनाने वाहतूक रोखली आहे.
आश्रमापासून 2 किलोमीटर अगोदर झोतेश्वर गावाजवळ प्रशासनाने वाहतूक रोखली आहे.
बातम्या आणखी आहेत...