आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मुसेवालाला मारणारे दोन शूटर, हस्तक अटकेत, दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सोमवारी मुख्य शूटरसह तीन गुंडांना अटक केली. ही अटक हरियाणा आणि पंजाबमधून करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींमध्ये मुख्य शूटर हरियाणाच्या सोनीपतचा रहिवासी प्रियव्रत उर्फ फौजी(२६) आहे. दुसरा मारेकरी झज्जर जिल्ह्यातील कशिश(२४) आहे. पोलिसांनुसार, सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये या दोघांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांचा साथीदार पंजाबच्या भटिंडाचा रहिवासी केशवकुमारलाही(२९) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडे आठ ग्रेनेड, नऊ इलेक्ट्रिक डेटोनेटर, तीन पिस्तुल आणि एक असॉल्ट रायफल जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...