आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Soldiers Martyred During Security Encounter In Baramulla, Security Forces Killed 1 Terrorist

जम्मू-काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एनकाउंटर:बारामूलामध्ये एनकाउंटरदरम्यान दोन जवान शहीद, प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा

बारामूलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बारामूलातील करीरी परिसरात सुरू असलेल्या एनकाउंटरदरम्यान जखमी झालेले दोन जवान शहीद झाले. यादरम्यान सैन्याकडून एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरुच आहे. कालपासून सुरू असलेल्या या एनकाउंटरमध्ये सुरक्षादलाकडून आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सर्च ऑपरेशनदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला.

काल तीन जवान शहीद , तर लश्करचा कमांडर ठार

बारामूलामध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी सीआरपीएफ आणि पोलिसाच्या संयुक्त पार्टीवर हल्ला चढवला. हल्ल्यात 3 जवान शहीद झाले तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यात लश्कर-ए-तैयबाचाका टॉप कमांडर सज्जाद उर्फ हैदर होता. यानंतर सोमवारी संध्याकाळी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स (सीआरपीएफ) कँपवर हल्ला केला. यात एक जवान जखमी झाला.

बातम्या आणखी आहेत...