आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लश्करचे दोन दहशतवादी ठार

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी 19 मे रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या एनकाउंटरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमधील कुलगामच्या मंजगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. एनकाउंटर सोमवारी सकाळी सुरू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात लश्करचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. 34 राष्ट्रीय रायफल (आरआर), सेंट्रल रिजर्व पोलिस फोर्स आणि कुलगाम पोलिसांनी या दहशतवाद्यांना एका ठिकाणी घेरले होते. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोघांना मारण्यात आले.

यापूर्वी 19 मे रोजी श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरा सुरक्षादलाने 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. 18 मे च्या रात्री 2 वाजता ऑपरेशन सुरू झाले होते. जास्त लोकसंख्या असलेल्या नवाकदलमध्ये हिजबुल मुजाहिदीनचे 2 दहशतवादी लपले होते, ज्यात एक कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियतचा प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा जुनैददेखील होता.

बातम्या आणखी आहेत...