आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Terrorists Involved In SPO Assassination Killed; Four Terrorists Killed In 24 Hours In Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाेपियात चकमक:एसपीओच्या हत्येत सहभागी दाेन दहशतवाद्यांचा खात्मा; काश्मीरमध्ये 24 तासांत चार दहशतवादी ठार

जम्मूएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
  • चकमकीमुळे जिल्ह्यात अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्यात आली

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलाबराेबर झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचे दाेन अतिरेकी ठार झाले. सुरक्षा दलाबराेबर करण्यात अालेल्या संयुक्त कारवाईदरम्यान ही चकमक झाली. या दहशतवाद्यांनी १३ एप्रिल राेजी दाेन एसपीअाेंवर हल्ला करून शस्त्रे लुटली होती. यात एसपीअाे पी. इक्बाल शहीद झाले. तर विशाल सिंह हे जखमी झाले. जम्मू विभागाचे पाेलिस महानिरीक्षक मुकेश सिंह म्हणाले, या दाेन दहशतवाद्यांच्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. 

शाेपियात चकमक...

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. शोपियाच्या किगाम भागात ही चकमकी घडली. त्यानंतर  जिल्ह्यात  काेणत्याही अफवा पसरवू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने इंटरनेट सेवा बंद करण्यात अाली.

बातम्या आणखी आहेत...