आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Two Terrorists Killed In An Encounter With Security Forces In Sugan Area Of Shopian

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरात एन्काउंटर:सुरक्षादलाने शोपियांमध्ये 3 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, AK-47 आणि 2 पिस्तूल हस्तगत; 16 तास चालले एन्काउंटर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एन्काउंटर मंळवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि बुधवारी सकाळी जवळपास 11.30 वाजता संपले.

जम्मू-कश्मीरच्या शोपिया जिल्ह्याच्या सगुन परिसरात सुरक्षादलाने बुधवारी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एन्काउंटर मंळवारी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाले आणि बुधवारी सकाळी जवळपास 11.30 वाजता संपले. दहशतवादी लपलेले असल्याची सूचना मिळाल्यानंतर सिक्योरिटी फोर्सेजने सर्च ऑपरेशन सुरू केले होते. पोलिसांनी दहशतवाद्यांना सरेंडर करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी फायरिंग सुरू केली होती.

गेल्या आठवड्यात पुलवामामध्ये 2 दहशतवादी ठार
पुलवामा जिल्ह्याच्या अवंतीपोराच्या संबूरा परिसरात 27 सुप्टेंबरला दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये एन्काउंटर झाले होते. सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. दहशतवाद्यांच्या फायरिंगमध्ये एक पोलिस जखमी झाला होता. तर सोमवारी पुलवामा जिल्ह्याच्या पंपोरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहीद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...