आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Types Of Politics In The Country; Family Criticism And Patriotism, Criticism Of Modi On Dynasty On BJP Foundation Day|Marathi News

भाजप स्थापना दिन:देशात दोन प्रकारचे राजकारण; कुटुंबभक्ती अन् देशभक्ती, भाजप स्थापनादिनी मोदींची घराणेशाहीवर टीका

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने बुधवारी आपला ४२ वा स्थापना दिन साजरा केला. देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात दोन प्रकारचे राजकारण आहे. पहिले देशभक्ती आणि दुसरे कुटुंबाची भक्ती. भाजप राष्ट्रभक्तीसाठी आहे, तर भाजपचे प्रतिस्पर्धी ‘कुटुंब भक्ती’मध्ये उभे आहेत. घराणेशाहीची परंपरा असलेले पक्ष लोकशाहीचे ‘सर्वात मोठे शत्रू’ आहेत.

मोदी म्हणाले, घराणेशाही असलेले पक्ष एकमेकांचा भ्रष्टाचार आणि चुकीची कामे लपवतात. राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्यांमध्ये हे पक्ष सत्तेत येतात तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदेपर्यंत काही कुटुंबे वरचढ होतात. केवळ भाजपने अशा राजकीय पक्षांना आव्हान दिले आहे. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, घराणेशाही असलेल्या पक्षांनी तरुणांमधील प्रतिभा समोर येऊ दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...