आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष एनआयए न्यायालयात:मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील दोन साक्षीदार दोन दिवसांत फितूर

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी दोन साक्षीदार दोन दिवसांत फितूर झाले आहेत. या खटल्यामध्ये आतापर्यंत फितूर साक्षीदारांची संख्या २८ वर गेली आहे. या स्फोटात ६ ठार आणि १०० जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादी प्रतिबंधक पथक (एटीएस) कडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) गेल्यानंतर हा खटला विशेष एनआयए न्यायालयात सुरू आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य एक आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांच्या सहभागाबद्दल उलटतपासणी सुरू होती. त्या वेळी आपल्याला काहीच आठवत नसल्याचे २८ व्या साक्षीदाराने सांगितले. त्यामुळे हा साक्षीदार फितूर झाल्याची भीती सरकारी पक्षाने व्यक्त केली. यापूर्वीही एका साक्षीदाराने न्यायालयात हेच कारण सांगितले होते. गुरुवारी विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असताना महाराष्ट्र एटीएसला काय जबाब दिला याचे विस्मरण झाल्याचे २७ व्या साक्षीदाराने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...