आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Women Army Officers Selected To Train As Combat Pilots; News And Live Updates

भारतीय सैन्यात प्रथमच:दोन महिला अधिकारी हेलिकॉप्टरने करणार उड्डाण, नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधून निवड

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैन्यात महिलांसाठी नवीन मार्ग उघडणे स्तुत्य उपक्रम - राजेश्वरी कोरी

भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकारी प्रथमच हेलिकॉप्टरने उड्डाण करणार आहे. हे भारतीय सैन्यांच्या इतिहासात पहिल्यादांच घडले आहे. ही निवड नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधून करण्यात आली आहे. आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना केवळ ग्राऊंड ड्युटी देण्यात येत असल्याचे भारतीय लष्कराने बुधवारी सांगितले.

जूलै 2022 मध्ये पूर्ण होणार प्रशिक्षण
आर्मी एव्हिएशनच्या एका वर्षाच्या कोर्समध्ये सामील होण्यासाठी 15 महिला अधिकाऱ्यांनी आवेदन केले होते. परंतु, ही निवड प्रक्रिया कठीण असल्याने यामध्ये केवळ दोन महिला अधिकाऱ्यांनाचा प्रवेश मिळाला. या निवड प्रक्रियेत 'पायलट एप्टीट्यूड बॅटरी टेस्ट' आणि मेडिकल टेस्टचा समावेश होता. या बॅचमध्ये 47 अधिकाऱ्यांचा समावेश असून जूलैमध्ये सुरु होणारे हे प्रशिक्षण जुलै 2022 मध्ये पूर्ण होईल.

महिला कर्मचाऱ्यांना आतापर्यंत फक्त एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा ग्राऊंड ड्युटीवरच लावण्यात येत होते. महिला अधिकाऱ्यांना आर्मी एव्हिएशन संघात निवड करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रस्तावाला लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी मान्यता दिली होती. सैन्य, नौदल आणि हवाई दलात 9 हजार 118 महिला कर्मचारी असल्याचे सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये संसदेला सांगितले होते.

सैन्यात महिलांसाठी नवीन मार्ग उघडणे स्तुत्य उपक्रम - राजेश्वरी कोरी
आर्मी एव्हिएशन कोरची स्थापना नोव्हेंबर 1686 मध्ये करण्यात आली. आर्मी एव्हिएशनमध्ये ध्रुव, चेतक, चित्ता यांचा वापर करण्यात येतो. गेल्या 6 वर्षात सैन्यात महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. नागरी संरक्षण उप-नियंत्रक (महाराष्ट्र) आणि माजी लेफ्टनंट कमांडर, राजेश्वरी कोरी म्हणाल्या की, “सैन्य दलाने महिलांसाठी उघडलेले नवीन मार्ग पाहून खरोखरच आश्चर्य वाटले.”

बातम्या आणखी आहेत...