आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात महागडी मधुशाला:दोन महिलांनी लावली दारूच्या ठेक्यासाठी 510 कोटीची बोली

जयपूर/हनुमानगडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या दारूच्या दुकानांच्या ई-लिलावामध्ये प्रचंड स्पर्धा पाहायला मिळाली. लिलावाच्या तिसऱ्या दिवशी तर हनुमानगड मधील सर्व विक्रम मोडीस निघाले. एका कुटुंबातील दोन महिलांमध्ये अशी स्पर्धा झाली की, दारूच्या दुकानाची बोली त्याच्या किमतीपेक्षा ७०८ पट अधिक वाढली. बेस किंमत ७२.७० लाख रुपये होती. मात्र १५ तास चाललेल्या बदलीनंतर ५१० कोटीत किरण कंवर यांच्या नावावर गेली. उत्पादन शुल्क अधिकारी चिमणलाल मीणाने सांगितले, हनुमानगड जिल्ह्यात ही दारुची दुकान नोहरच्या कुईयांमध्ये आहे. गेल्या वर्षी या दुकानाची बोली ६५ लाख रुपये लागली होती. बोली लावणाऱ्या किरणला दोन टक्के रक्कम जमा करण्याचे डिमांड नोटीस पाठवले आहे. तिला तीन दिवसात पैसा जमा करावा लागेल. तिने जर दुकान घेतले नाही तर तिला काळ्या यादीत टाकले जाईल, असे ठरले आहे. विभागाने तिच्या नावाचे अलॉटमेंट लेटरही काढले आहे.

कौटुंबिक कलह आणि ऑनलाइन बिडिंगला विरोध ?
दारूच्या दुकानाची बोली इतक्या उंचीवर गेली म्हणून वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. काहीजण म्हणतात की कौटुंबिक कलह व वैमनस्य वृत्तीमुळे दुकानाची बोली इतकी वाढली. काही जण ऑनलाइन लिलाव प्रक्रियेला विरोध करण्याचे धोरण म्हणत आहेत. खरतर, कंत्राटदार ऑनलाइन बिडिंग प्रक्रियेला विरोध करत आहेत. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार हे दुकान (हनुमानगड वाली) घेण्यासाठी रुपये जमा केले नाही तर फक्त दीड लाख रुपये जप्त केले जातील. त्यामुळे, सरकारला पुन्हा लिलाव करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...