आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबनाची कारवाई:महाकाल मंदिर परिसरात नृत्य करणाऱ्या दोन महिला सुरक्षा रक्षक निलंबित

उज्जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात बॉलीवूड गीतावर नृत्य करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या २ महिला सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यावर असताना केवळ कीपॅड फोन वापरावेत स्मार्टफोन वापरू नयेत,असे निर्देश देण्यात आल्याचे देवस्थानच्या अधिकाऱ्याने सांगितले. एका खासगी संस्थेच्या कर्मचारी असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे मंदिराचे प्रशासक संदीप सोनी यांनी सांगितले. मंदिर परिसरात तीन पाळ्यांमध्ये ३९० कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात आहेत. एका पाळीत महिला व पुरुषासह किमान ७५ कर्मचारी तैनात असतात. २ महिलांनी नृत्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

बातम्या आणखी आहेत...