आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Two Youths Of Gujarat And Maharashtra Dead Due To Heart Attack While Playing Garba

गरबा खेळता-खेळता मृत्यू:गुजरात-महाराष्ट्रामधील घटना, दोन्ही तरुणांना गरबा खेळताना हार्ट अटॅक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील आनंद शहरात गरबा खेळत असताना एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 30 सप्टेंबर रोजी रात्री तारापूर, आणंद येथील शिवशक्ती सोसायटीत घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

असाच एक प्रकार महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात समोर आला आहे. येथे शनिवारी रात्री गरबा खेळत असताना एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या वडिलांना माहिती मिळताच त्यांनाही झटका आला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचाही मृत्यू झाला.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

शहरातील तारापूर परिसरातील शिवशक्ती सोसायटीत 9 दिवस गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी रात्री 21 वर्षीय वीरेंद्र सिंग राजपूत हा देखील गरबा खेळत होता. यादरम्यान तो जमिनीवर कोसळला. सोसायटीतील लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वीरेंद्रचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितले की त्याला अ‌ॅटॅक आला आहे. सोसायटीतील लोक त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात घेऊन जाऊ लागले. मात्र रस्त्यातच त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मित्र व्हिडीओ बनवत होता

वीरेंद्र हा सोसायटीतील लोकांसोबत गरबा खेळत होता. यादरम्यान एक मित्र त्याचा व्हिडिओ बनवत होता. वीरेंद्र अडखळला आणि त्याच्या मित्राजवळ कोसळला. वीरेंद्रच्या एका मित्राने सांगितले की, तो फक्त गरबा पाहत होता, पण मित्रांनी आग्रह केल्यावर त्यानेही गरबा खेळायला सुरुवात केली. याच दरम्यान ही घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...