आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Typhoid And Jaundice Vaccines Before Every Adventure In The Jungle: Bare Grills Aware Of Vaccination

मुलाखत:जंगलातील प्रत्येक साहसी प्रवासापूर्वी टायफॉइड, काविळीची लस घेतोच : बेअर ग्रिल्स लसीकरणाबाबत अत्यंत जागरूक

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसिद्ध साहसवीर म्हणतो-अनेकदा संसर्ग झाला, मात्र कोणत्याही साहसाआधी सुरक्षितता महत्त्वाचीच

सध्याच्या या महामारीतील चिंता आणि लॉकडाऊनच्या बंधनांत तुम्ही टीव्हीवर निसर्गातील आव्हाणे पेलणारे प्रसिद्ध साहसवीर बेअर गिल्स यांना पाहून नक्की रोमांचित होत असाल. तुम्हाला या साहसवीराबद्दल एेकून आश्चर्य वाटेल की, बेअर ग्रिल्सही कोणत्याही साहसी प्रवासापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध आजारांच्या लस आठवणीने घेतात. २३ मेपासून नॅशनल जिओग्राफिकवर सुरू होत असलेल्या आपल्या नव्या “संडे थ्रिल्स विद ग्रिल्स’ कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनिक भास्करशी बोलताना बेअर ग्रिल्स यांनी लसीचे महत्त्व पटवून दिले. त्यातील मुख्य अंश...

तुम्हाला कधी कोणत्या प्रकारचा संसर्ग झाला आहे?
हो, मला गेल्या काही वर्षांत जंगलांमध्ये अनेकदा संसर्ग झाला. मधमाशी चावल्याने होणाऱ्या अॅनाफिलेक्टिक शॉकसह साप चावल्यामुळेही संसर्ग झाला आहे. जंगलांत तुम्हाला खूपच सावध राहावे लागते. परिस्थिती प्रतिकूल असेल तर सुरक्षेसाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतात. कधी कधी हे एखाद्या युद्धासारखेच असते.

संसर्ग होऊ नये म्हणून तुम्ही लस घेतली आहे?... कारण तुम्हाला तर नेहमीच धोकादायक वातावरणात संसर्गांना आमंत्रण देण्याचीच सवय आहे!
हो, मला नेहमीच वनराईत जाण्यापूर्वी टायफॉइड किंवा काविळीचे डोस घ्यावे लागतात. हा कामाचाच भाग आहे. स्वत: सुरक्षित व्हा, नंतरच साहस करा.

जीवनातील सर्वात चित्तथरारक, धोकादायक क्षण कोणता?
एव्हरेस्ट सर करणे माझ्या सर्वात चित्तथरारक क्षण होता. या शिखरावरून तिबेटचा सूर्योदय पाहिल्याचा क्षण आजही मनात ताजा आहे. मात्र, यात खूप जाेखीम होती. या चढाईत ४ गिर्यारोहकांचा जीव गेला. या मोहिमेने माझ्यात खूप मोठे बदल झाले. ते नुकसान सहन करणे कठीण होतेच, परंतु या घटनेने मला जीवनदानच मिळाले. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

नॅशनल जिओग्राफिकवर तुमचा नवा कार्यक्रम येत आहे. यात वेगळे आम्हाला काय पाहता येईल?
जगातील सर्वात भयंकर व भीतिदायक तसेच सर्वात सुंदर जंगलांत आम्ही जाऊ. तुम्ही पाहाल, मी सामान्य लोकांसह प्रसिद्ध व्यक्तींनाही याचा अनुभव देतो आहे की प्रतिकूल स्थिती आपल्याला कशी बदलून टाकते. यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते.

तुम्ही यापूर्वीही प्रसिद्ध व्यक्तींना अशा साहसात सोबत नेले आहे. या कठीण स्थितीत तुम्ही त्यांच्यात काय पाहिले?
मला वाटते आपण सारेच जण एखाद्या द्राक्षासारखे आहोत. जेंव्हा चुरले जाते तेव्हाच कळते की वास्तविक आपली घडण कशी आहे. जंगले कधीच कुणाशी भेदभाव करत नाहीत. मग तुम्ही वृद्ध असा की तरुण, प्रसिद्ध असा किंवा नाही, उंच असा किंवा बुटके...

बातम्या आणखी आहेत...