आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भयंकर:बलात्कारानंतर मुलीच्या बॉडीचे 10 तुकडे, 8 वर्षीय चिमुरडी 4 दिवसांपासून होती बेपत्ता; निर्जनस्थळी आढळला मृतदेह

उदयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील एका भग्न वाड्यात तिच्या मृतदेहाचे तुकडे पडल्याचे आढळले. उदयपूरच्या मावली भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी मृतदेह आढळल्यानंतर 24 तासांनी या घटनेचा खुलासा केला. या प्रकरणी एका तरुणाच्या बलात्कार व हत्येप्रकरणी मुसक्या आवळण्यात आल्यात.

एसपी विकास शर्मा यांनी सांगितले की, मुलगी सरकारी शाळेतील इयत्ता चौथीत शिकत होती. 4 दिवसांपूर्वी शाळेतून आल्यानंतर ती शेताकडे निघाली, पण शेतात पोहोचलीच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. पण तिचा शोध न लागल्याने त्यांनी 28 मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा सलग 4 दिवस शोध घेतला. अखेर शनिवारी सायंकाळी उशिरा तिच्या घरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावरील एका भग्नावशेष वाड्यात तिचा मृतदेह आढळला.

या हत्येच्या विरोधात रविवारी नागरिकांनी धरणे दिले. त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा देण्याची मागणी केली.
या हत्येच्या विरोधात रविवारी नागरिकांनी धरणे दिले. त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा देण्याची मागणी केली.

आरोपीने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे - तुकडे केले होते. पोलिसांनी ते गोळा करून शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर रविवारी सकाळी तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

एसपीने सांगितले की, या प्रकरणी कमलेश (21) नामक तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यात कमलेशने बलात्कार व हत्येची गोष्ट कबूल केली. आरोपीने सांगितले की, मुलीचे अपहरण केल्यानंतर मी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर धारदार सुरीने स्वतःच्या घरात तिच्या हाता-पायासह संपूर्ण शरिराचे 10 तुकडे केले. त्यानंतर छिन्नविच्छिन्न स्थितीतील तिचा मृतदेह थैलीत भरून निर्जन स्थळी फेकून दिला. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे.

मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी

मृत मुलीच्या चुलत्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी हा कठला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सरकारकडे नुकसान भरपाईचीही मागणी केली आहे.

दिव्य मराठीच्या खालील बातम्या वाचा...

महरोलीच्या जंगलात आढळलेली हाडे श्रद्धाचीच:DNA वडिलांशी जुळला; आफताबने सांगितलेल्या ठिकाणी आढळली होती हाडे

अवघ्या देशाचे समाजमन सुन्न करणाऱ्या श्रद्धा हत्याकांडाप्रकरणी दिल्ली पोलिसांना गुरुवारी मोठे यश मिळाले. ANIच्या वृत्तानुसार, महरौली व गुरुग्रामच्या जंगलात आढळलेल्या हाडांचा DNA श्रद्धाच्या वडिलांशी मॅच झाला आहे. यामुळे ही हाडे श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, 28 वर्षीय आफताबने 18 मे रोजी 27 वर्षीय श्रद्धा वालकरची हत्या केली होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले होते. ते ठेवण्यासाठी त्याने 300 लीटरचा फ्रिज खरेदी केले होते. तो सलग 18 दिवस मध्यरात्री 2 च्या सुमारास मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जंगलात जात होता.

आफताबने नार्को व पॉलीग्राफ टेस्टमध्ये स्वीकारली होती हत्येची गोष्ट

गत महिन्यात आफताबची नार्को टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्याने श्रद्धाची हत्या केल्याची बाब कबूल केली होती. दिल्लीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सलग 2 तास आफताबची नार्को टेस्ट झाली. त्यात विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांना त्याने इंग्रजीत उत्तर दिले. त्याने पॉलीग्राफ टेस्टमध्येही श्रद्धाच्या हत्येची गोष्ट कबूल केली होती. तसेच आपल्याला या प्रकरणी कोणताही पश्चाताप होत नसल्याचेही स्पष्ट केले होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

हाँगकाँगमध्ये श्रध्दा हत्याकांडासारखी घटना:माजी पतीने मॉडेलच्या मृतदेहाचे केले तुकडे, फ्रीजमध्ये सापडले कापलेले पाय; अवयवांचा शोध सुरू

दिल्लीच्या श्रध्दा वालकर हत्याकांडासारखी एक धक्कादायक घटना हाँगकाँगमध्ये समोर आली आहे. हॉंगकॉंगमधील प्रसिद्ध मॉडेल अ‌ॅबी चोईच्या माजी पतीने तिची हत्या केली. चोईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. पोलिसांनी घराच्या रेफ्रिजरेटरमधून एबी चोईचा कापलेला पाय जप्त केला. तर शरीराच्या उर्वरित अवयवांचा शोध सुरू आहे. शरीराचे काही तुकडे, इलेक्ट्रिक कटर आणि कपडेही जप्त करण्यात आले आहे.

28 वर्षीय चोई 22 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती. 24 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली असता त्यावेळी फ्रीजमध्ये तिच्या मृतदेहाचे कापलेले पाय सापडले. एबीच्या माजी पतीला 25 फेब्रुवारी रोजी तिच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता शरीराच्या उर्वरीत अवयवांचा शोध सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...