आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uday Lalit To Be Chief Justice Today, Responsible For Disposal Of Cases Like Article 370, CAA

न्यायमूर्तींची नियुक्ती:उदय लळीत आज होणार सरन्यायाधीश; कलम 370, सीएएसारख्या प्रकरणांच्या निपटाऱ्याची जबाबदारी

पवनकुमार | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्या. उदय लळीत शनिवारी ४९ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ देतील. सरन्यायाधीशांच्या रूपात लळीत यांचा कार्यकाळाचा सोमवारी पहिला दिवस असेल व या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ ७४ दिवस असेल.

यादरम्यान, त्यांना सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित ४९२ घटनात्मक प्रकरणांचा निपटारा करण्याचे आव्हान असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, २६ ऑगस्टपर्यंत कोर्टात ७१,४११ अन्य प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये कलम ३७०, नोटबंदी, सीएए, निवडणूक रोखे, यूएपीए आणि सबरीमालासारख्या चर्चित प्रकरणांचा समावेश आहे. सेवानिवृत्त होत असलेल्या रमणा यांनी १ मे २०२१ रोजी पदभार स्वीकारला होता. तेव्हा ३९६ घटनात्मक प्रकरणे प्रलंबित होते. त्यांच्या १५ महिन्यांच्या कार्यकाळात केवळ मराठा आरक्षण प्रकरणाचा निपटारा घटनात्मक पीठाने केला. मात्र, ते निकाल देणाऱ्या घटनात्मक पीठात नव्हते.

न्या. लळित गुन्हेगारी कायद्याचे तज्ज्ञ

गुन्हेगारी कायद्याचे तज्ज्ञ न्या.यू.यू.लळित यांनी जून १९८३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली. १९८६ ते १९९२ पर्यंत माजी अ‌ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत त्यंानी काम केले. २००४ पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १३ ऑगस्ट २०१४ रोजी वकील मंडळातून सर्वाेच्च न्यायालयात न्यायमूर्ती नियुक्त केले. यातून सर न्यायाधीश होणारे ते दुसरे जज असतील.

न्यायपालिका कुण्या एका आदेशाने संचालित होत नाही : सीजेआय रमणा

सर न्यायाधीश एन.व्ही.रमणा शुक्रवारी निवृत्त झाले. निरोपाच्या भाषणात त्यांनी वकिलांना सल्ला देत सांगितले की, यशाचा शॉर्टकट नसतो. संघर्ष करणारा व्यक्ती ध्येय गाठतो.न्या. रमणा म्हणाले, १२ व्या वर्षी पहिल्यांदा वीज पाहिली. १७ व्या वर्षी १० हजार मजूरांचे नेतृत्व केले. सध्या वकिलांना चेंबर मिळते, मी वकिली करत होतो तेव्हा झाडाखाली अशिलाशी बोलत होतो.

पहिल्यांदाच थेट प्रक्षेपण

सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीकडून शुक्रवारी पहिल्यांदाच सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवसाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. निरोप समारंभाआधी कोर्टरूममध्ये उपस्थित वकिलांना रमणा म्हणाले, मला लिस्टिंग आणि पोस्टिंगच्या मुद्‌द्यांवर न दिल्याबद्दल खेद आहे.

बातम्या आणखी आहेत...