आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीन तलाक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या पीठात समावेश राहिलेले न्यायमूर्ती उदय यू. लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्टला संपेल. लळीत २७ ऑगस्टला शपथ घेतील आणि या वर्षी ८ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होतील. या हिशेबाने ते ७४ दिवस सरन्यायाधीश पदावर राहतील. त्यांच्यानंतर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड ज्येष्ठताक्रमात सर्वात वर असल्याने ५० वे सरन्यायाधीश होऊ शकतात.
न्यायमूर्ती लळीत हे वकील ते थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होऊन सरन्यायाधीश होणारे दुसरे व्यक्ती ठरतील. याआधी १९७१ मध्ये न्यायमूर्ती एस. एम. सिकरी १३ वे सरन्यायाधीश झाले होते.
अनेक महत्त्वाचे निकाल देणाऱ्या न्यायपीठांत सहभाग
ज्येष्ठ विधिज्ञ न्या. लळीत यांची १३ ऑगस्ट २०१४ ला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली. ऑगस्ट २०१७ मध्ये तीन तलाकव्यतिरिक्त अनेक मोठे निकाल देणाऱ्या न्यायपीठात त्यांचा समावेश होता. त्यांनी केरळ उच्च न्यायालयाचा निकाल फिरवून त्रावणकोर राजकुटुंबाला श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचा अधिकार दिला होता. लैंगिक हिंसाचारात स्किन टू स्किन स्पर्श अनिवार्य नाही,’ असा आदेशही त्यांनी दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.