आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uddhav Thackeray: Maharashtra Coronavirus Third Wave | Uddhav Thackeray Government Working On Oxygen

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महाराष्ट्र सज्ज:2300 मीट्रिक टन ऑक्सिजनच्या मागणीची शक्यता, मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत 3000 मीट्रिक टन प्रोडक्शनचे लक्ष्य

नवी दिल्ली (विनोद यादव)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिशन ऑक्सिजन स्वावलंबनने वाढेल प्रोडक्शन

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारचा अंदाज आहे की, कोरोनाची तिसरी लाट आल्यावर राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून 2300 मीट्रिक टन होऊ शकते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 3,000 मीट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाच्या लक्ष्यावर काम सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राची दररोजची ऑक्सिजन प्रोडक्शन क्षमता सध्या 1300 मीट्रिक टन आहे. राज्यात ऑक्सिजनची सध्याची मागणी 1800 मीट्रिक टन अशी आहे. राज्य सरकारचा अंदाज आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवेळी दररोज ऑक्सिजनची मागणी 1800 मीट्रिक टनने वाढून 2300 मीट्रिक टन होऊन जाईल.

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनने वाढेल प्रोडक्शन
ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी 'मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' अंतर्गत उद्योग समुहांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह, आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठवण, क्रिटिकल गॅप शोधून कारवाई करणे, ट्रान्सपोर्टची योजना बनवण्यासह अनेक पैलूंवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल आहे
महाराष्ट्रात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि 18 ते 44 वर्षांमधील लोकांना मिळून एकूण 1.88 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये 36.55 लाख दुसरा डोस घेणाऱ्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रानंतर 1.45 कोटी राजस्थान, 1.44 कोटी गुजरात आणि उत्तरप्रदेशच्या 1.39 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण 2.08 टक्के आहे आणि भारतात ते 1.09 टक्के आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर 1.49 टक्के आहे. ठाकरे सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्राची आणखी एक चिंतेची बाब ही आहे की कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी राज्यात सर्वाधिक कोविड रूग्णांची संख्या 3.02 लाख होती तर 12 मे रोजी दुसर्‍या लाटेच्या वेळी आज सक्रिय कोविड रूग्णांची संख्या 5.46 लाख आहे. दरम्यान राज्याच्या 10 जिल्ह्यांमध्ये 64.58 टक्के अॅक्टिव्ह पेशंट आहेत. याच कारणामुळे ठाकरे सरकारने तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी आतापासूनच करणे सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...