आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uddhav Thackeray Narendra Modi Video Conferencing Update; Modi Says There Is No Need For Lockdown In The Country, Increase RTPCR Test; News And Live Updates

दिव्‍य मराठी पडताळणी:टेस्ट - निम्मी राज्ये फेल; मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात विक्रमी 1,31,787 नवे रुग्ण, सहा महिन्यांनंतर सर्वाधिक 802 मृत्यू

मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे. भास्करच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगड राज्यांनी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सलग आरटीपीसीआर कमी केल्या. म्हणूनच या राज्यांत संसर्ग वाढला. फेब्रुवारीपर्यंत देशात ६१% आरटीपीसीआर चाचण्या होत होत्या. ५० टक्केही आरटीपीसीआर न करणारी निम्मी राज्ये आहेत. १२ राज्यांत ७०%हून अधिक आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. पाच राज्यांत ५०% हून अधिक, पण निश्चित प्रमाणापेक्षा अशा कमी चाचण्या करत आहेत. १२ राज्यांत हे प्रमाण ४०%हून कमी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही विविध राज्यांतील चाचण्यांची ही स्थिती मान्य केली आहे.

मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवा
छोटे-छोटे कंटेनमेंट झोन बनवा. त्यात सर्व लोकांची टेस्टिंग करा. त्याचा परिणाम होईल. कष्टाचे चीज होईल.
राज्यांनी ७०% टेस्ट आरटीपीसीआर कराव्यात, पॉझिटिव्ह रेट ५% पेक्षा कमी होईल. लसीपेक्षा जास्त चर्चा टेस्टिंगची करा
नाइट कर्फ्यूला कोरोना कर्फ्यू म्हणा. कर्फ्यूमुळे कोरोना काळात जगतो हे लक्षात राहते. दैनंदिन जीवनावर परिणाम होत नाही. टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि कोविड अॅप्रोप्रिएट बिहेविअरसह कोविड मॅनेजमेंटवरही आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.
११ ते १४ एप्रिलपर्यंत देशात लसोत्सव साजरा करा. ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी.

लोकसंख्येच्या मानाने एकूण टेस्ट दिल्लीत जास्त, मध्य प्रदेशात कमी
लोकसंख्येच्या हिशेबाने रोज एकूण चाचण्यांत दिल्ली (4876 टेस्ट प्रति 10 लाख लोकसंख्या), चंदीगड (2730), गुजरात (1912), महाराष्ट्र (1897), केरळ (1708), छत्तीसगड (1459), पंजाब (1455) यांची स्थिती चांगली. मध्य प्रदेश (399), झारखंड (583) राजस्थान (628), बिहार (696), उत्तर प्रदेश (803) या राज्यांची कामगिरी वाईट आहे. देशात सरासरी 914 टेस्ट आहे.

गुजरातसह १८ राज्यांत टेस्ट कमी
राज्य टक्केवारी
केरळ 45.7
उत्तर प्रदेश 45.5
उत्तराखंड 40.4
ओडिशा 32.0
छत्तीसगड 30.6
गुजरात 27.0

ही राज्ये टेस्टमध्ये बेस्ट, १२ चा त्यावरच भर
राज्य टक्केवारी
तामिळनाडू 98.1
राजस्थान 97.1
हरियाणा 91.5
चंदीगड 81.4
पंजाब 76.0
मध्य प्रदेश 73.9

आरटीपीसीआरच का?
आयसीएमआरचे वैज्ञानिक डॉ. समीरण पांडा यांनी सांगितले की, अँटिजन टेस्टमध्ये सेन्सिव्हिटी कमी असते. चुकीचा अहवाल येण्याची शक्यता असते. लक्षणे नसल्यास अँटिजन टेस्ट जास्त प्रभावी नसते. लक्षण असलेल्यांत प्रभावी आहे. जेथे तत्काळ तपासणीची गरज असते तेथे अँटिजन टेस्ट केल्या पाहिजे. िरपोर्ट १५ मिनिटांत येतो. अँटिजन रिपोर्ट निगेटिव्ह अालेले मात्र काेरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. कमीत कमी ७०% आरटीपीसीआर होणे आवश्यक आहे.

देशात विक्रमी 1,31,787 नवे रुग्ण, सहा महिन्यांनंतर सर्वाधिक 802 मृत्यू
देशात गुरुवारी कोरोनाचे १,३१,७८७ नवे रुग्ण आढळले. हा कोरोना काळातील सर्वात मोठा आकडा आहे. ८०२ मृत्यू झाले. हे यावर्षी झालेले सर्वाधिक मृत्यू आहेत. देशात सहा महिन्यांनंतर एका दिवसात एवढे मृत्यू झाले. याआधी १७ ऑक्टोबर २०२० ला एवढे मृत्यू झाले होते. महाराष्ट्रात पुन्हा एकदा स‌र्वाधिक ५६,२८६ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनाही संसर्ग झाला. दरम्यान, मेमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा ऑनलाइन घ्या, अशी मागणी १० वी आणि १२ वीच्या एक लाखावर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिकेद्वारे केली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशच्या सर्व शहरी भागांत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन राहील.

बातम्या आणखी आहेत...