आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक दिवसापूर्वीच बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १५ जूनला दिल्लीत बैठक बोलावली आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीत सहभागी होणार नाहीत. तेव्हा ते अयोध्येत असतील.
शिवसेना पक्षातर्फे एखादा प्रमुख नेता या बैठकीत सहभागी होईल. सत्तारूढ भाजपतर्फे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राजनाथसिंह सर्वसहमतीच्या उमेदवाराच्या नावावर रालोआचे सहकारी पक्ष, अपक्षांचे नेते आणि यूपीएतील पक्षांशी चर्चा करतील.
दुसरीकडे, राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना समविचारी पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. खरगे यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.