आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन एज्युकेशन न्यू नॉर्मल:यूजीसीकडून 38 विद्यापीठांच्या 171 ऑनलाइन अभ्यासक्रमांना परवानगी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इच्छुक शिक्षण संस्थांकडून मागवले होते यूजीसीने अर्ज

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील ३८ विद्यापीठांना पूर्णपणे आॅनलाइन १७१ पदवी अभ्यासक्रम चालवण्याची मंजुरी दिली आहे. या विद्यापीठांना आता या अभ्यासक्रमांसाठी यूजीसीची पूर्व परवानगी घेण्याची गरज नसेल. वृत्तानुसार ऑनलाइन अभ्यासक्रमाची मंजुरी मिळवणाऱ्यांमध्ये १५ डीम्ड (अभिमत), १३ राज्ये, तीन केंद्रीय आणि तीन खासगी विद्यापीठांचा समावेश आहे.

यातील सर्वाधिक ११ विद्यापीठे तामिळनाडूतील आहेत. त्यांना एकूण ७२ अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाला चार ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम चालवण्याची मंजुरी मिळाली आहे. यात दोन एमबीए आणि दोन एमसाठी आहेत. राजस्थानात खासगी मणिपाल विद्यापीठाला चार आणि अभिमत विद्यापीठ बनस्थली विद्यापीठाला सात अभ्यासक्रम ऑनलाइन चालवण्याची परवानगी मिळाली आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियामध्ये एमए (शिक्षण) आणि एमए (सार्वजनिक प्रशासन), जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एमए (संस्कृत) अभ्यासक्रम ऑनलाइन असेल. तर मिझोरम विद्यापीठात चार ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम असतील. जम्मू विद्यापीठात एमए (इंग्रजी) आणि एमकॉमचे अभ्यासक्रम ऑनलाइन चालवले जातील. या आधी यूजीसीने कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामान्य अभ्यासक्रम ४० टक्क्यांपर्यंत ऑनलाइन शिकवण्याची परवानगी दिली आहे.

इच्छुक शिक्षण संस्थांकडून मागवले होते यूजीसीने अर्ज
यूजीसीने काही दिवसांपूर्वी २०२१-२२ साठी ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम देऊ इच्छिणाऱ्या शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले होते. यूजीसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रत्येक संस्थेला अर्जासोबत एक शपथपत्रही सादर करायचे होते. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आणि ऑनलाइन प्रोग्राम नियमन- २०२० च्या सर्व तरतुदींचे पालन करतील. राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (एनएएसी) किंवा नेशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)च्या अटी पूर्ण करतात तोपर्यंत ऑनलाइन पदवी अभ्यासक्रमाची मंजुरी मिळालेल्या विद्यापीठांना हे अभ्यासक्रम सुरू ठेवता येतील.

बातम्या आणखी आहेत...