आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UGC Asks Educational Institutions To Put Up Banners Thanking PM For Free Vaccination

मोफत लसीकरणाचा वादग्रस्त प्रचार:'मोफत लसीकरणासाठी पंतप्रधानांना धन्यवाद देणारे बॅनर लावा'; UGC चा शैक्षणिक संस्थांना फरमान

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक विद्यापीठांनी बॅनर शेअर केले

यूनिव्हर्सिटी ग्रांट्स कमीशन (UGC) ने सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि टेक्निकल इंस्टीट्यूट्सना मोफत लसीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद देणारे बॅनर लावण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी सोमवारी दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 याच महिन्यात 18+ वयोगटासाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. सोमवारी याची सुरुवात झाली. रविवारी विविध यूनिव्हर्सिटीजच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका व्हॉट्सअॅप मेजेसमध्ये UGC सेक्रेटरी रजनीश जैनने संस्थांच्या सोशल मीडिया पेजवर धन्यवादचे बॅनर शेअर करण्यास सांगितले आहे.

बॅनरचा फॉर्मेटही पाठवला
रजनीश जैनच्या कथित मेसेजमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार 21 जून, 2021 पासून 18 + वयोगटाचे मोफल लसीकरण सुरू करत आहे. याबाबत विद्यापीठ आणि कॉलेजने आपल्या सोशल मीडियावर बॅनर शेअर करावे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाकडून उपलब्ध केलेले होर्डिंग्स आणि बॅनरचे डिझाइन हिंदी आणि इंग्रजीमध्ये रेफरेंससाठी अठॅच आहेत. पोस्टरवर नरेंद्र मोदींचा फोटो आहे. त्यावर थँक यू PM मोदी लिहीले आहे. याबाबत विचारण्यासाठी जैन यांना फोन केला असता, त्यांनी उत्तर दिले नाही. पण, तीन विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी या मेसेजची पुष्टी केली आहे.

अनेक विद्यापीठांनी बॅनर शेअर केले
दिल्ली यूनिव्हर्सिटी, हैदराबाद यूनिव्हर्सिटी, भोपाळमध्ये LNCT यूनिव्हर्सिटी, बेनेट यूनिव्हर्सिटी, गुडगावमधील नॉर्थकॅप यूनिव्हर्सिटी यांनी आपल्या सोशल मीडियावर हॅशटॅगसह ThankyouModiji लिहून बॅनर शेअर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...