आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम वर्षाच्या परिक्षेचा प्रश्न कायम:अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर, आता 18 ऑगस्टला होणार निर्णय

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात 18 ऑगस्ट रोजी केली जाणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात युवासेना यासोबतच काही विद्यार्थ्यांकडून याचिका दाखळ करण्यात आली आहे. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. आजच्या सुनावणीत सगळे युक्तिवाद एकाच बाजूचे होते. पुढील सुनावणी यूजीसीची बाजू येणार आहे.

आज सर्वोच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आले. यश दुबे या विद्यार्थ्याच्या बाजूने बोलताना अभिषेक मनु सिंघवी यांनी काही युक्तिवाद केले. ते म्हणाले की, सध्या सर्व विद्यार्थी हे परगावी अडकलेले आहेत. ते परिक्षेला कसे पोहोचू शकतील? यासोबतच सध्या सार्वजनिक वाहतूक बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना येताना अनेक समस्या येऊ शकतात. तसेच विद्यार्थी बाहेर पडल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या वतीनेही एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावतीने बोलताना श्याम दिवाण यांनी युक्तविदा केला की, यूजीसीच्या गाईडलाईन्स या मार्गदर्शक आहेत त्या बंधनकारक नाहीत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लोकल यंत्रणाच हा निर्णय घेतील. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्स लॉकडाऊनबाबत येतात. त्यात आणि यूजीसीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय यात विरोधाभास आहे.

बातम्या आणखी आहेत...