आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या वाढत्या धोक्यादरम्यान ब्रिटनवरुन भारतासाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये लँड झालेल्या UK च्या पहिल्या फ्लाइटमधून 256 प्रवासी भारतात आले. केंद्र सरकारने आजपासूनच ब्रिटन-भारत विमान सेवा सुरू केली आहे. यापूर्वी भारतातून ब्रिटनला जाणारी विमानसेवा 6 जानेवारीला सुरू केली होती. दरम्यान, भारतात आतापर्यंत ब्रिटनमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनचे 75 रुग्ण आढळले आहेत.
प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या चाचणी गरजेच्या
सरकारने ब्रिटनवरुन आलेल्या फ्लाइटच्या सर्व पॅसेंजर्स आणि क्रू मेंबर्सची RT-PCR चाचणी गरजेची केली आहे. विमानतळावर यासाठी आवश्यक त्या सोई करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना त्यांची कोरोना रिपोर्ट आल्यानंतरच विमानतळातून बाहेर जाण्याची परवानगी असेल.
आठवड्यात 30 फ्लाइट्स ऑपरेट होतील
सिवील एविएशन मिनिस्टर हरदीप सिंग पुरी म्हणाले होते की, दर आठवड्यात 30 फ्लाइट्स ऑपरेट होतील. 15 भारतातून आणि 15 ब्रिटनमधून येतील. तर, दिल्ली विमानतळाने प्रवाशांना अपील केली आहे की, त्यांनी आपल्या कनेक्टिंग फ्लाइट्समध्ये 10 तासांचा गॅप ठेवावा.
केंद्राने 23 दिसेंबरला घातली होती बंदी
केंद्र सरकारने मागच्या महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप आढळल्यानंतर 23 डिसेंबरपासून 7 जानेवारीपर्यंत ब्रिटनवरुन येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली होती. तसेच, ब्रिटनमधून आलेल्या लोकांसाठी वेगळ्या गाइडलाइन्सदेखील जारी केल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.