आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UK New Virus Strain Cases Found In India: Genome Sequencing Of The Infected Is Compulsory Who Returned To The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 रुग्णांमध्ये आढळला नवीन कोरोना:9 ते 22 डिसेंबर दरम्यान देशात परतलेल्या कोरोना बाधितांची जीनोम सिक्वेंसिंग करणे आवश्यक, ब्रिटनची उड्डाणे बंद राहण्याची चिन्हे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायरस कसा आहे? कसा दिसतो? याची माहिती जीनोममध्ये मिळते

भारतातही कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन पोहोचला आहे. देशात सहा कोरोना बाधितांमध्ये हा व्हायरस आढळला आहे. हे सर्व नुकतेच ब्रिटनमधून परतले होते. यापैकी 3 नमुने बंगळुरू, 3 हैद्राबाद आणि 1 पुण्यातील संस्थांकडे पाठवले होते. यापैकी तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या एक-एक नमुन्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची पुष्टी झाली. उर्वरित तीन रुग्ण कर्नाटकातील आहेत.

नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, 9 ते 22 डिसेंबर दरम्यान भारतात आलेले प्रवासी जे संक्रमित आढळले त्यांची जीनोम सीक्वेंसिंग करणे अनिवार्य आहे. तसेच ब्रिटनमधून येणाऱ्या विमान उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत असलेली बंदी पुढेही कायम राहू शकते.

सर्व रुग्ण आयसोलेशनमध्ये

या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांत राज्य सरकारच्या कोविड सेंटरमध्ये एका रूममध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले होते. यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. नवीन बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना शोध घेणे सुरू आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटनहून जवळपास 33 हजार प्रवासी भारतात आले होते. यांपैकी आतापर्यंत 114 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आणखी काही नमुन्यांमध्ये जीनोमचा शोध घेतला जात आहे.

काय आहे जीनोम सिक्वेंसिंग?

जीनोम सिक्वेन्सींग व्हायरसची संपूर्ण माहिती असते ज्यात व्हायरसचा संपूर्ण डेटा असतो. व्हायरस कसा आहे? कसा दिसतो? याची माहिती जीनोममध्ये मिळते. व्हायरसच्या मोठ्या स्वरूपाला जीनोम म्हटले जाते. व्हायरस बाबत जाणून घेण्याच्या प्रक्रियेस जीनोम सिक्वेंसिंग म्हणतात. या माध्यमातून कोरोनाचा नवीन स्ट्रेन शोधला जात आहे.

व्हायरसचे नवीन रुप 70% जास्त वेगाने पसरते

व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत राहते, म्हणजे याचे गुण बदलतात. जास्तीत जास्त व्हेरिएंट स्वतःच नष्ट होतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा बरेच पटीने मजबूत आणि धोकादायक बनतात. ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की वैज्ञानिकांना एक रूपही समजत नाही आणि एक नवीन रूप समोर येत आहे. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% वेगाने पसरू शकते.

बातम्या आणखी आहेत...