आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम:युक्रेन संकट, रिटेल स्टोअर्स ग्राहकांना देताहेत मर्यादित तेल

इंदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन संकटाचा थेट परिणाम खाद्यतेल पुरवठ्यावर झाला आहे. देशातील अनेक मोठ्या रिटेल स्टोअर्सनी ग्राहकांसाठी खाद्यतेलांची रेशनिंग सुरू केली आहे. एका ग्राहकाला साधारणत: एक किलोची कमाल ३-४ पाकिटे आणि ५ किंवा १५ किलोचा केवळ एक पॅक दिला जात आहे.

देशामध्ये खाद्यतेलाचा वापर दरडोई १९ किलो आहे. यापैकी ११ किलोची गरज आयातीतून भागवली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे या देशांतील सूर्यफूल तेलाचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे होळीमुळे मागणी वाढली आहे. अशा वेळी रिलायन्स फ्रेश आणि डी-मार्ट आदी रिटेल स्टोअर्स ग्राहकांना मर्यादित खाद्यतेल देत आहेत. इंदूरमधील डी-मार्टचे स्टोअर मॅनेजर अमित अवस्थी म्हणाले, ही सुविधा १०-१५ दिवसांपासून दिली जात आहे. तर, रिलायन्सचे स्टोअर इन्चार्ज नीरज प्रजापत म्हणाले, एका ग्राहकाला १ किलोच्या चार पाकिटांपेक्षा जास्त दिले जात नाही. तथापि, ५ आणि १५ किलोचा डबाही एकापेक्षा जास्त दिला जात नाही. साठ्याची चिंताही वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...