आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ukraine Russia | Ukraine PM Yulia Tymoshenko VS Russian President Vladimir Putin

रशिया-युक्रेन युद्ध:यूक्रेनच्या पहिल्या पंतप्रधान युलियांची नागरिकांना भासतेय कमतरता, पुतिन यांना उघडपणे धमकी देत म्हणायच्या - 'एक इंचही जमीन घेऊ देणार नाही'

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युलिया टेमोसेन्कोव्ह या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्या दोनदा युक्रेनच्या पंतप्रधान राहिल्या. या पदावर असतानाही त्या रशियाविरुद्ध उघडपणे बोलत असत. पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध असावे यासाठी त्यांचा पुढाकार असायचा आणि युक्रेनने नाटोमध्ये सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

युक्रेनचे लोक काढत आहेत युलियाची आठवण
यावेळी आक्रमकता दाखवणारा रशिया युलिया यांना कधीही घाबरवू शकला नाही. युलिया या न लढता देखील रशियाला 'एक इंचही जमीन' द्यायला तयार नव्हत्या. युक्रेनच्या सध्याच्या संकटानंतर तेथील जनता आपल्या धाडसी महिला पंतप्रधानांची आठवण काढत आहे. युलिया यांच्या हातात देशाचे नेतृत्व असते तर आज परिस्थिती वेगळी असती असे त्यांना वाटते.

गॅस क्वीन ज्या पंतप्रधान झाल्या
युलिया यांना युक्रेनमध्ये गॅस क्वीन म्हणून ओळखले जात होते. त्यांचा तेथे गॅसचा मोठा व्यवसाय होता. युक्रेनच्या सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांमध्ये त्यांची गणना होत होती. पुढे त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्या युक्रेनच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. 2005 मध्ये काही महिने आणि 2007 ते 2010 पर्यंत त्या युक्रेनच्या पंतप्रधान होत्या.

'मी एक इंचही जमीन देणार नाही'
पंतप्रधान किंवा विरोधी पक्षनेते असतानाही युलिया यांची आक्रमक वृत्ती कधीच कमी झाली नाही. त्या युक्रेनला रशियाच्या पालकत्वातून काढून टाकण्यास पाठिंबा देत राहिल्या. त्या रशियाला उघडपणे धमकी देत म्हणायच्या की, 'रशियाला एक इंचही जमीन घेऊ देणार नाही'.

ऑकेंज रिवोल्यूशन ज्यामध्ये राष्ट्रपतींना देश सोडावा लागला
2004 च्या निवडणुकीत रशिया समर्थक राष्ट्रपती व्हिक्टर युश्नकोव्ह यांनी विजय मिळवला. युलिया यांच्यासह इतर विरोधी नेत्यांनी व्हिक्टरवर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला. त्यामुळे देशात 'ऑरेंज रिवोल्यूशन' सुरू झाले. युलिया यांच्या पक्षाचा झेंडा केशरी रंगाचा होता आणि रशियाकडे झुकलेल्या व्हिक्टर यांच्या विरोधात त्या आघाडीवर होत्या. त्यामुळे या आंदोलनाला ‘ऑरेंज रिवोल्यूशन’ असे नाव देण्यात आले. युलिया या चळवळीत एक प्रमुख नेता म्हणून उदयास आल्या. युक्रेनमध्ये या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. अखेरीस व्हिक्टरला देश आणि पद सोडून रशियाला पळून जावे लागले.

राजकीय बंदी ज्यासाठी जगभरात आवाज उठवला गेला
2010 मध्ये युलिया यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. निकालांमध्ये, त्या व्हिक्टर युश्नकोव्हपेक्षा केवळ 3.3% मतांनी मागे राहिल्या. व्हिक्टर युश्नकोव्ह हे राष्ट्रपती बनताच युलिया यांचे वाईट दिवस सुरू झाले. रशियासोबतच्या गॅस करारात भ्रष्टाचाराचा आरोप करून अध्यक्ष व्हिक्टर युश्न्कोव्ह यांनी पंतप्रधान असताना यूलियाला तुरुंगात टाकले. 2011 ते 2014 पर्यंत त्या तुरुंगात होत्या. त्याच्या अटकेला जगाने राजकीय सूड म्हणून पाहिले. तुरुंगातही त्यांनी खूप यातना सहन केल्या. तुरुंगात असताना त्यांना युरोपियन युनियन आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांचा पाठिंबा मिळाला.

जगातील तिसऱ्या सर्वात शक्तिशाली महिलेचा किताब
2005 मध्ये, फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत युलिया यांना तिसरे स्थान दिले होते. युलिया या केवळ युक्रेनच्याच नव्हे तर पूर्वीच्या सोव्हिएत युनियनच्या देशांतील पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.

बातम्या आणखी आहेत...