आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uma Bharti Will Not Attend Ram Mandir Bhoomi Poojan Due To Covid19 Precaution After Home Minister Amit Shah Tests Possitive

मी जाणार नाही:राम मंदिर भूमीपूजनात सहभागी होणार नाहीत उमा भारती; म्हणाल्या, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि मोदींच्या आरोग्यावर चिंतीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कृपया राम मंदीर भूमी पूजनात आमंत्रितांच्या यादीतून माझे नाव हटवा
  • भूमी पूजन कार्यक्रम झाल्यानंतर घेणार रामललाचे दर्शन -उमा भारती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण राम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाही असे उमा भारती यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कद्दावर नेत्यांपैकी एक उमा भारती यांनी अमित शहा यांचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. देशातील वाढता कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याबद्दल चिंतीत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यक्रम झाल्यानंतर घेणार रामललाचे दर्शन

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्मितीसाठी भूमी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आपण कोरोनामुळे सहभागी होणार नाही. भूमी पूजन झाल्यानंतर शरयू नदी किनारी जाउन राम ललाचे दर्शन घेणार असे उमा भारती यांनी सांगितले आहे. सोबतच, राम मंदिर भूमी पूजनासाठी तयार करण्यात आलेल्या आमंत्रितांच्या यादीतून कृपपया माझे नाव हटवा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.

पंतप्रधानांच्या आरोग्याची चिंता

उमा भारती यांनी ट्विट करून लिहिले, 'काल अमित शहा जी आणि उत्तर प्रदेशचे भाजप नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले तेव्हापासूनच राम मंदिर शिलान्यास कार्यक्रमात उपस्थित होणाऱ्या प्रामुख्याने पीएम नरेंद्र मोदींच्या आरोग्यावर मी चिंतीत आहे." भोपाळ येथून त्या आजच अयोध्येसाठी रवाना होत आहेत. परंतु, त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होत असल्याने मला पंतप्रधानांच्या आरोग्याची चिंता आहे असे त्या म्हणाल्या आहेत.

अमित शहांना कोरोनाची लागण

उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोनाचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, त्यांना गुरूग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली होती. शहा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन शहा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...