आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर आरोपींची बिर्याणी पार्टी:NIA चा विशेष न्यायालयात दावा, आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत कोठडी

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अमरावती हत्याकांडाप्रकरणी जेरबंद करण्यात आलेल्या 2 आरोपींना शुक्रवारी विशेष कोर्टापुढे हजर केले. एनआयएने कोर्टात या दोघांच्याही कोठडीची मागणी करताना त्यांनी उमेशच्या हत्येनंतर बिर्याणी खाऊन आनंद साजरा केल्याचा दावा केला. मौलवी मुशफीक अहमद व अब्दुल अरबाज अशी आरोपींची नावे आहेत.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवले. कोल्हे यांची 21 जून रोजी पूर्व महाराष्ट्रातील अमरावती शहरात हत्या करण्यात आली होती. त्यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

मास्टरमाइंड इरफानच्या संपर्कात होते आरोपी

NIA च्या माहितीनुसार, अहमदने आरोपींना लॉजिस्टिक सपोर्ट दिला. अरबाजने उमेश व त्याच्या दुकानाची रेकी केली. या दोघांनी उमेशच्या हत्येनंतर इतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली. एवढेच नाही मुशफीकने हत्येचा मास्टरमाइंड शेख इरफान याच्याशी फोनवरुन थेट संवाद साधला होता. तर अब्दुल, इरफानच्या संघटनेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. मास्टरमाइंड इरफान रहबर नामक एक स्वयंसेवी संस्था चालवत होता.

आरोपींवर UAPA अंतर्गत कारवाई

अरबाज व मुशफीक हे या प्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या इरफान शेख, शोएब खान, मुदस्सीर अहमद, आतिफ राशिद, युसूफ खान, अब्दुल तौफुक व शाहरुख पठाण व शमीम अहमद फिरोज अहमद यांचे सहकारी आहेत. NIA ने या दोघांवरही आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

NIA घेणार पार्टी करणाऱ्यांचा शोध

NIA ने हत्येचा आनंद साजरा करणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी केली. त्याचा आरोपीचे वकील काशिफ खान यांनी तीव्र विरोध केला. आरोपी अतिरेकी असल्यामुळे त्यांच्या रिमांडची काहीच गरज नाही, असे ते म्हणाले.

तपास यंत्रणा कोणत्याही अतिरेकी संघटनेचे नाव न घेता हे एक अतिरेकी कृत्य असल्याचा कांगावा करत आहे. बिर्याणी पार्टीचा उल्लेख केवळ अतिरंजकता दाखवण्यासाठी केला जात आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...