आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रयागराजमधील उमेश पाल हत्याकांडानंतर बाहुबली नेता अतिक अहमदच्या जवळच्या लोकांच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. युपी सरकारची प्रयागराजमध्ये बुलडोझर कारवाई सुरू आहे. प्रयागराजमधील असरौली भागातील माशुकुद्दीनच्या घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे.
पीडीएची (प्रयागराज विकास प्राधिकरण) टीम असरौली परिसरात 3 जेसीबी आणि पोकलँड मशीन घेऊन पोहोचली. येथे अतिक अहमदचा फायनान्सर माशुक प्रधान उर्फ माशुकद्दीनचे घर बुलडोझरने पाडण्यात आले.पाडण्यात आलेल्या घराचे क्षेत्रफळ अडीचशे चौरस यार्ड आहे. या घराची किंमत तीन कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेश पाल खून प्रकरणाशी माशुकचा थेट संबंध नाही. मात्र, त्याच्यावर 40 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
नकाशा मंजूर न करता घर बांधले
या जमिनीवर घर बांधण्यासाठी नकाशासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, तो नाकारल्यानंतरही घराचे बांधकाम करण्यात आले. ज्या ठिकाणी हे घर बांधले आहे. तेथे हवाई दलाचे ट्रान्समीटर क्षेत्र सुरू होते. याच कारणामुळे हवाई दलानेही घराच्या बांधकामावर आक्षेप घेतला होता. मात्र माशुक उद्दीनने दादागिरी दाखवत बांधकाम करून घेतले होते.
कारवाईवर नाराजी
सपा खासदार डॉ.शफीकुर रहमान बर्कयांनी बुलडोझरच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. मुरादाबादच्या संभलमध्ये खासदार म्हणाले, ही दडपशाही आहे, कारवाई नाही. मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. भारतात कायदा लागू असताना सरकार कायद्यानुसार काम का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच पुढे ते म्हणाले की, योगी सरकारने माफियांचा सफाया करणार असल्याचे सांगितले होते. पण, आधी माफियांचा नायनाट करण्याऐवजी सरकारी यंत्रणा सुरळीत करा. देशात लोकशाही आहे, तर मग बुलडोझरचा अर्थ काय? तुम्ही बुलडोझरने संपूर्ण जग नष्ट कराल का? असेही ते म्हणाले.
सफदरच्या घरावर बुलडोझर
तत्पूर्वी गुरुवारी अतिकच्या जवळ असलेल्या सफदरच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला होता. घराचा नकाशा जवळ नसल्याचे पीडीएने सांगितले. सफदरला अनेकदा नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. उत्तर न मिळाल्याने कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, सफदर म्हणाले की, मुस्लिम असल्याने प्रशासनाने कारवाई केली. माझ्या घराचा नकाशा जवळच आहे. बेकायदेशीरपणे घर पाडण्यात आले.
पीडीए बॉम्बर गुड्डू मुस्लिमच्या घरावर बुलडोझर चालवणार असल्याची बातमी यापूर्वी आली होती. गुड्डू मुस्लिम हा गेल्या आठवड्यात उमेश पालच्या हत्येमध्ये सहभाग होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुड्डू मुस्लिम उमेश पाल यांच्यावर निर्भयपणे बॉम्ब फेकताना दिसत आहे. गुड्डू बॅगेतून एक बॉम्ब काढून फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
3 बुलडोझरने 5 तासांत 3 कोटींचे घर फोडले
बुधवारी प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या पथकाने अतिकच्या जवळ असलेल्या जफर अहमद यांचे दुमजली घर बुलडोझरने पाडले. 200 स्क्वेअर यार्डमध्ये बांधलेल्या या आलिशान घराची किंमत 3 कोटी रुपये होती. 2020 मध्ये जेव्हा अतिक अहमदचे घर पाडण्यात आले, तेव्हा जफरनेच आपल्या कुटुंबाला येथे आश्रय दिला होता. या घरात शाइस्ता परवीन आपल्या मुलांसह राहत होत्या. उमेश पाल हत्येच्या दिवशी गोळीबार करणाऱ्यांनी या घरात आश्रय घेतला होता.
दहशत अशी की 10 न्यायाधीशांनी केस सोडली, युपीच्या 5 माफियांचे किस्से
अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती कारागृहात ठेवण्यात आले आहे, परंतु प्रयागराजमध्ये नुकत्याच झालेल्या उमेश पाल हत्येमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. वास्तविक, माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येतील उमेश हा मुख्य साक्षीदार होता आणि अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ आरोपी आहेत. आज दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये यूपीच्या 5 मोठ्या माफियांच्या कथा वाचा. सर्वात आधी अतिक अहमदची गोष्ट... - येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.