आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा17 वर्षांपूर्वीच्या उमेश पाल अपहरण प्रकरणात प्रयागराजच्या MP-MLA न्यायालयाने गँगस्टर अतिक अहमदसह 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये अतिक गँगवर 101 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 1 असणाऱ्या या प्रकरणात अतिकला दोषी घोषित करून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दुसरीकडे, न्यायालयाने त्याला साबरमती तुरुंगात परत पाठवण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार त्याला लवकरच तिथे हलवण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती दिनेश चंद्र शुक्ल यांनी अतिकसह खान सौलत हनीफ व दिनेश पासी यांनाही जन्मठेप ठोठावली आहे. या तिघांना प्रत्येकी 1 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम उमेशच्या कुटुंबीयांना दिली जाईल. दुसरीकडे, अतिकचे वकील दया शंकर मिश्रा यांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्याची घोषणा केली आहे.
दुसरीकडे, फरहान, जावेद उर्फ बज्जू, आबिद, इसरार, आशिक उर्फ मल्ली, एजाज अख्तर यांच्यासह अश्रफ उर्फ खालिद अझीम यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर अतिक व अशरफ यांना दुपारी 3.30 वाजता पुन्हा नैनी कारागृहात नेण्यात आले. तिथे पत्रकारांनी अतिक-अशरफवर प्रश्नांची सरबत्ती केली. पण त्यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. अतिकला साबरमती व अशरफला बरेली तुरुंगात पाठवण्यासाठी समन्स नैनी तुरुंगात पोहोचला आहे. पण या दोघांना पुन्हा केव्हा परत पाठवले जाणार हे अजून स्पष्ट झाले नाही.
दुसरीकडे, अतिकला पुन्हा नैनी तुरुंगात आणण्यात आले आहे. पण त्याला अजून आत घेण्यात आले नाही. दोन्ही जेल व्हॅन जेलच्या गेटवर उभ्या आहेत. वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शशिकांत सिंह यांनी अतिकला तुरुंगात घेण्यास नकार दिला आहे. नैनी तुरुंग अधीक्षकांच्या माहितीनुसार, माफिया अतिक अहमदला गुजरात व अशरफला बरेलीला पाठवले जाईल.
उमेश पालची आई म्हणाली- माझा मुलगा सिंहासारखा लढला
न्यायालयाच्या निकालानंतर उमेश पालची आई शांती देवी म्हणाल्या- "माझा मुलगा सिंहासारखा लढला. अतिकला फाशी झाली पाहिजे." दरम्यान, पत्नी जया पाल म्हणाल्या, "योगीजी माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. ते आमच्या कुटुंबाची काळजी घेतील."
असे आणले कोर्टात
नैनी मध्यवर्ती कारागृहातून प्रथम फरहान, नंतर अशरफ आणि शेवटी अतिक यांना कोर्टात हजर करण्यात आले. नैनी मध्यवर्ती कारागृहातून 50 सुरक्षा कर्मचारी अतिकच्या सोबत होते.कोर्टापर्यंतचे 10 किमीचे अंतर 15 ते 20 मिनिटांत कापले जाईल. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.
निकालापूर्वी अतिकला SC कडून धक्का, सुरक्षेची मागणी फेटाळली
दरम्यान, उमेश पाल खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अतिक अहमदने सुरक्षेसाठी केलेले अपील फेटाळून लावले आहे. जोपर्यंत तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे, तोपर्यंत त्याला सुरक्षा देण्यात यावी, असे अतिकने याचिकेत म्हटले होते. आपल्याला यूपीच्या तुरुंगात हलवायचे नाही, असे अतिकने सांगितले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने अतिकच्या वकिलाला त्याची तक्रार उच्च न्यायालयात घेऊन जाण्यास सांगितली.
ताजे अपडेट्स वाचा.....
दोघांनाही नैनी सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते
अतिक आणि अशरफ यांना वेगवेगळ्या व्हॅनमधून वेगवेगळ्या मार्गाने कोर्टात नेले जाऊ शकते. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ याच्यासह 11 जणांना आरोपी करण्यात आले होते, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला बरेली तुरुंगातून सोमवारी संध्याकाळी प्रयागराजला आणण्यात आले. दोघांना नैनी मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा बराकीत ठेवण्यात आले होते.
अपडेट्स...
हे ही वाचा
1300 KM चा प्रवास 23 तासात पूर्ण:अतिक अहमद प्रयागराजच्या नैनी कारागृहात पोहोचला
उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता प्रयागराज येथील नैनी तुरुंगात पोहोचला. अतिकचा मुलगाही याच कारागृहात आहे. उमेश पालच्या अपहरणप्रकरणी अतिकला मंगळवारी प्रयागराजच्या विशेष MP/MLA न्यायालयात हजर केले जाईल. याच प्रकरणात त्याच्या भावालाही बरेलीहून प्रयागराजला आणले गेले. - वाचा अतिकचा संपूर्ण प्रवास
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.