आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20:युद्ध रोखण्यात यूएनला अपयश; फळं भोगतात गरीब देश : मोदी

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती भवनात गुरुवारी जी-20 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू झाली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, युद्ध रोखणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे (यूएन) स्थापन झाली. परंतु ते अपयशी ठरले आहे. त्याची फळे गरीब देशांना भोगावी लागत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख टाळून मोदी म्हणाले, हा तणाव कसा कमी होईल, याबाबत आपण सर्वांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. त्यासोबतच जे या सभागृहात नाहीत त्यांचाही विचार झाला पाहिजे. इकडे,युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर प्रथमच अमेरिका आणि रशिया यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची १० मिनिटे भेट झाली. यानंतर बोलतान अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन म्हणाले की, रशियाने युद्ध थांबवले पाहिजे. अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा कायम राहिल.

युक्रेन युद्धावर सहमती नाही, प्रथमच संयुक्त निवेदन जारी झाले नाही जी20 देशांमध्ये युक्रेन युद्धाच्या मुद्यावर सहमती होऊ शकली नाही. या मुद्यावर संयुक्त निवेदनही जारी करण्यात आले नाही. हे प्रथमच घडले. केवळ सारांश आणि संयुक्त निष्कर्ष दस्तऐवज जारी करण्यात आले.

इटलीच्या पंतप्रधान म्हणाल्या, जगभरातील नेत्यांचे नरेंद्र मोदी हे आवडते नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जिओर्जिओ मेलोनी यांची गुरुवारी रायसीना येथे भेट झाली. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर बोलणी झाली. या वेळी बोलताना मेलोनी म्हणाल्या, मोदी हे जगभरातील सर्वच नेत्यांचे आवडते नेते आहेत. ते एक प्रमुख नेते असल्याचे सिद्ध झाले असून त्यासाठी त्यांचे अभिनंदन. मेलोनी यांच्या वक्तव्यावर मोदींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.

बातम्या आणखी आहेत...