आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Unbalanced Expenses, Rs 310 Crore Of Child Support In Water! 4.75 Lakh Fake Bases Were Created | Marathi News

कॅगचे ताशेरे:5 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आधार कार्डवर 310 कोटी रुपये व्यर्थ खर्च केले, देशात 4.75 लाख बनावट आधार कार्ड तयार झाले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महालेखा परीक्षकांनी (कॅग) पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना आधार कार्ड देणे आणि त्याच्या प्रक्रियेवर झालेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कॅगने बुधवारी संसदेला आपला अहवाल सोपवला. सरकारने पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आधार कार्डवर ३१० कोटी रुपये व्यर्थ खर्च केल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. कारण यूआयडीएआय मुलांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी त्यांचे बायोमेट्रिक घेत नाही. वास्तविक आधार कार्डचा मूळ आधार मानला गेला आहे. यूआयडीएआयला अंतर्गत तपासात एक बाब आढळून आली. त्यानुसार मार्च २०१९ पर्यंत ११.४८ कोटी बाल आधार कार्ड तयार करण्यात आले. त्यासाठी नोंदणी व एजन्सीला प्रति मूल २७ रुपये दराने ३१० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. एक नोव्हेंबर २०१९ रोजी मुलांचे बायोमेट्रिक अपडेट झाले नसल्याने ४०.९१ लाख आधार निष्क्रिय करावे लागले. आधार नसलेल्या मुलांना अनुदान, लाभ किंवा सेवांपासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०१८ मध्ये स्पष्ट केले आहे. म्हणूनच बाल आधार कार्ड देऊन काहीही लाभ झालेला नाही.

२०१० पासून दररोज १४५ कार्ड रद्द करण्याचे काम झाले
कॅगच्या म्हणण्यानुसार २०१० पासून नोव्हेंबर २०१९ पर्यंत यूआयडीएआयने ४.७५ लाख डुप्लिकेट आधार कार्ड रद्द केले. म्हणजे दररोज १४५ कार्ड रद्द झाले. २०१८-१९ या काळात ३.०४ कोटी बायोमेट्रिक अपडेट लोकांनी ७३ टक्क्यांहून जास्त अपडेट शुल्क जमा केले. त्यावरून आधारसाठी एकत्रित केलेल्या डेटाची गुणवत्ता योग्य नसल्याचेही कॅगला आढळून आले आहे.

सैन्यात केवळ ४ टक्के महिला अधिकारी, संख्या तत्काळ वाढवा
कॅग म्हणाले, सैन्यात शॉट सर्व्हिस कमिशन महिला अधिकाऱ्यांची संख्या तत्काळ वाढ करण्याची गरज आहे. जानेवारी २० पर्यंत १६४८ कमिशंड महिला अधिकारी होत्या. हे प्रमाण ४ टक्के आहे. वास्तविक सैन्यात अधिकारी पदावर येण्यासाठी इच्छूक महिला उमेदवारांची संख्या रिक्त पदांच्या तुलनेत ४-८ टक्के जास्त आहे. विधी क्षेत्रात ५६ पदांसाठी २४८ उमेदवार पात्र ठरल्या. एनसीसीडब्ल्यूच्या परीक्षेत ४१ पदांसाठी ३४७ मेडिकल उत्तीर्ण झाले. महिलांसाठी चार कोर्समधील निवडलेल्या उमेदवारांपैकी उत्तीर्ण महिलांची संख्या दुप्पट होती.

बातम्या आणखी आहेत...