आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uncontrolled Crowd Of Laborers In Ghaziabad, Stone Pelting In Ahmedabad, 2 Jawans Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये घरवापसीसाठी संघर्ष:गाझियाबादेत मजुरांची गर्दी अनियंत्रित, अहमदाबादेत दगडफेक, 2 जवान जखमी

गाझियाबाद/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबादमध्ये घरवापसीसाठी नोंदणी करण्यासाठी पोहोचले हजारो मजूर. - Divya Marathi
गाझियाबादमध्ये घरवापसीसाठी नोंदणी करण्यासाठी पोहोचले हजारो मजूर.
  • पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, 263 ताब्यात

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील रामलीला मैदानात सोमवारी हजारोंच्या संख्येने मजूर जमा झाले. हे लोक श्रमिक रेल्वेने घरी जाण्यासाठी नोंदणी करण्यासाठी येथे आले होते. या दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले नाही. गर्दी ए‌‌वढी जास्त होती की, मजुरांची धक्काबुक्की सुरु होती. पोलिसही नियंत्रण मिळवू शकले नाही. बहुतांश मजूर बिहारचे होते.

गाझियाबादहून ६ रेल्वे सोडण्यात येणार आहेत. गाझियाबाद प्रशासनाने सांगितल्यानुसार, के‌वळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांनाच या रेल्वेतून जाण्याची परवानगी मिळेल. नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना एसएमएस मिळेल. यात रेल्वेचे नाव आणि वेळेची माहिती असेल. दुसरीकडे गुजरातमधील अहमदाबाद येथे सोमवारी सुमारे ३०० मजुरांनी घरी जाण्यासाठी आंदोलन केले. हे लोक आयआयएम अहमदाबाद रोड येथे जमा झाले. पोलिसांवर दगडफेकही केली. यात दोन जवान जखमी झाले. पोलिसांनी मजुरांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक मजूर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी २६३ मजुरांना ताब्यात घेतले आहे. मजूर म्हणाले की, त्यांना त्यांच्यासाठी बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

इटावामध्ये रेल्वेतून १३९ मजूर पळाले, तीन तासांत पकडले: यूपीतील इटावामध्ये १३९ मजूर रेल्वेतून पळाले. ते अहमदाबादहून वाराणसीला जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेतून प्रवास करत होते. त्यांनी इकदिल रेल्वे स्थानकाजवळ चेन ओढून रेल्वे थांबवली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...