आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Under Certain Circumstances, A Complete Fetal Abortion Can Be Performed At 24 Weeks

गर्भपात:विशिष्ट परिस्थितीत 24 आठवडे पूर्ण भ्रूणाचा गर्भपात करता येणार

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने गर्भपाताबाबतच्या नव्या नियमांची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार विशिष्ट परिस्थितीत महिलांच्या गर्भपाताची मुदत २० आठवड्यांवरून २४ आठवड्यांपर्यंत करण्यात आली आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (दुरुस्ती) अधिनियम २०२१ अनुसार, या श्रेणीत लैंगिक शाेषण, बलात्कारपीडिता, अल्पवयीन मुली, दिव्यांग, घटस्फोटित वा पतीचा मृत्यू झालेल्या महिलांचा समावेश आहे. मनोरुग्ण, भ्रूणातील विकृतीचाही या श्रेणीत समावेश आहे. नवे नियम मार्चमध्ये संसदेद्वारे पारित मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (दुरुस्ती) अधिनियम, २०२१ च्या अंतर्गत येतात. यापूर्वी १२ आठवड्यांपर्यंतच्या भ्रूणाच्या गर्भपातासाठी डाॅक्टरांचा सल्ला बंधनकारक होता. भ्रूूण १२ ते २० आठवड्यांचा असेल तर दोन डॉक्टरांचा सल्ला बंधनकारक होता.

नव्या नियमांनुसार, भ्रूणातील विकृतीच्या प्रकरणांत २४ आठवड्यांनंतरही गर्भपात करता येऊ शकेल का, हे ठरवण्यासाठी एक राज्यस्तरीय मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात येईल. मेडिकल बोर्डाचे काम महिला तिच्या अहवालांची तपासणी करण्याचे असेल.

बातम्या आणखी आहेत...