आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातमधील बडोद्यातील बावामाणपुरा परिसरात तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम सुरू होते आणि आधीपासून एका बाजूला झुकलेली होती. याबाबत लोकांनी प्रशासनाकडे तक्रारही केली होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
Gujarat: Three persons died after an under-construction building collapsed in Bawamanpura in Vadodara late last night. Rescue operation underway. pic.twitter.com/7xE1i1Xvjc
— ANI (@ANI) September 28, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.