आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20 लाख 48 हजार चुकीच्या लोकांना 1 लाख 364 कोटी रुपये देण्यात आले. माहितीच्या अधिकारात (RTI) मागितलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह (CHRI) शी संबंधित व्यंकटेश नायक यांनी ही माहिती मागितली होती.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या चुकीच्या लोकांना मदतीचा पैसा दिला त्यामध्ये दोन श्रेणींची ओळख झाली आहे. प्रथम असे शेतकरी आहेत ज्यांना त्यासाठी आवश्यक पात्रता नाही. दुसर्या प्रकारात असे शेतकरी आहेत जे आयकर भरतात.
व्यंकटेश यांच्या नुसार, RTI कडून मिळालेल्या माहितीत सांगितले की, या शेतकऱ्यांपैकी 55.58% आयकर भरतात. तर उर्वरित 44.41% योजनेच्या आवश्यक अटी पूर्ण करीत नाहीत.
पंजाबमध्ये अशा प्रकारचे सर्वाधिक शेतकरी
नायक यांच्यानुसार, पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात अशा शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याबाबतीत पंजाब अग्रस्थानी आहे. येथे एकूण 23.6%(4.74 लाख) चुकीच्या लोकांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले. अशाप्रकारे आसाममध्ये 16.8% (3.45 लाख) तर महाराष्ट्रात 13.99% (2.86 लाख) शेतकरी आहेत.
यानंतर गुजरात आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक येतो. येथे अनुक्रमे 8.05% (1.64 लाख) आणि 8.01% (1.64 लाख) शेतकरी आहेत. तर सिक्किममध्ये केवळ एकच चुकीचा शेतकरी असल्याचे माहितीत समोर आले आहे.
2019 मध्ये सुरू झाली होती योजना
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकर्यांना वर्षाला तीन वेळा 2-2 हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत नोंदणी करू शकतात. याशिवाय या योजनेसाठी पटवारी, महसूल अधिकारी व राज्य शासनाने नेमलेले फक्त नोडल अधिकारीच शेतकऱ्यांची नोंदणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे 11 कोटी शेतकर्यांना याचा फायदा झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.