आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत आहे अंडरवर्ल्ड डॉन:छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीनंतर एम्सचे स्पष्टीकरण- तो अद्याप जिवंत असून कोरोनावर उपचार घेत आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूच्या बातमीचे दिल्ली एम्सने खंडन केले आहे. एम्सने सांगितले आहे की, तो अद्याप जिवंत आहे आणि त्याच्या कोरोना संसर्गावर उपचार सुरु आहे. खरं तर, एम्समध्ये दाखल असलेल्या छोटा राजनचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला. त्यानंतर एम्सला एका निवेदनाद्वारे स्थिती स्पष्ट करावी लागली.

राजनला तिहारच्या उच्च सुरक्षा तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्याला तुरुंगातच कोरोना झाला होता. सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, परंतु प्रकृती खालावल्यानंतर 25 एप्रिल रोजी राजनला एम्समध्ये हलवण्यात आले. 27 वर्षांपासून फरार असलेल्या छोटा राजनला नोव्हेंबर 2015 मध्ये इंडोनेशियातून भारतात आणण्यात आले.

छोटा राजनवर 65 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते
छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे. त्याचा जन्म मुंबईच्या चेंबूर भागात टिळक नगर वस्तीत झाला. शाळा सोडल्यानंतर छोटा राजनने मुंबईत चित्रपटाची तिकिटं ब्लॅक करणे सुरू केले. यादरम्यान, तो राजन नायर टोळीत सामील झाला. अंडरवर्ल्डच्या जगात नायरला 'बडा राजन' म्हणून ओळखले जात होते.

कालांतराने, राजेंद्र (छोटा राजन) बडा राजनचा जवळचा झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर तो टोळीचा मुख्य झाला. छोटा राजन फरार होता, तेव्हा त्याच्यावर भारतात 65 पेक्षा जास्त फौजदारी खटले दाखल झाले होते. ही प्रकरणे बेकायदेशीर वसुली, धमकी, प्राणघातक हल्ला आणि खुनाच्या प्रयत्नांचे होते. त्याच्यावर 20 हून अधिक लोकांचा खून केल्याचा आरोप होता. पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आलेहोते. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दाऊदच्या मैत्रीने वाढली ताकद, 1993 ब्लास्टनंतर झाले एकमेकांचे शत्रू
राजन नायर टोळीत काम करत असताना त्याला छोटा राजन असे नाव पडले. त्यावेळी त्याची अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी ओळख झाली. दाऊदसोबत आल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा आलेख वाढला गेला होता. दोघांनी मिळून मुंबईत रिकव्हरी, खून, तस्करी अशी कामे करण्यास सुरवात केली. 1988 मध्ये राजन दुबई येथे गेला.

यानंतर, दाऊद आणि राजन यांनी जगभरात बेकायदेशीर कामे करण्यास सुरवात केली, परंतु 1993 मध्ये बाबरीच्या घटनेनंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडले तेव्हा राजनने आपला मार्ग वेगळा केला. त्या स्फोटांमध्ये दाऊदचा हात असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो त्याचा शत्रू बनला. त्याने स्वत: ला दाऊदपासून वेगळे केले आणि एक नवीन गॅंग बनवली.

बातम्या आणखी आहेत...