आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Underworld Don Chhota Rajan Was Admitted To All India Institute Of Medical Sciences In Delhi

तब्येत बिघडली:अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची तब्येत बिघडली, पोटाच्या तक्रारीमुळे एम्स रुग्णालयात करण्यात आले दाखल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजनला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.

अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये त्याला अॅडमिट करण्यात आले. पोटदुखीची तक्रारीनंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजनला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोना लक्षणे दिसत असल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.

बातम्या आणखी आहेत...