आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रिपुरातील आगरतळा येथील एका शोरूमच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कर्मचाऱ्याने पगार मागितल्याने शोरूम मालकाने बूट, चपलेने आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. दरम्यान, या सर्व प्रकरणाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दक्षिण आगरतळा पोलिसांनी संबंधित दुकानदारावर गुन्हा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सुरजीत हा आरोपी अपू साहाच्या शोरूममध्ये काम करायचा. कर्मचारी सुरजीत याने शोरूम मालकाकडे तीन महिन्यांचा थकीत पगार मागितला तेव्हा शोरूम मालक अपू साहा आणि अन्य कर्मचारी सागर दास यांनी सुरजीतला मारहाण केली.
कर्मचाऱ्याची विनवणी- मला मारू नका
कामगार वारंवार शोरूम मालकाला विनंती करित होता. माफी मागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तरी देखील शोरूम मालक त्याला मारत होता. त्याच्या अंगावरील कपडे फाडले. त्याचवेळी शोरूम मालकाच्या हातात लोखंडी रॉड असून, तो त्याला मारहाण करत आहे. एकदा कर्मचाऱ्याने हातातील लोखंडी रॉड पकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.