आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Budget 2021 News | Things That Happened For The First Time After Nirmala Sitharaman Announced AAM Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पात पहिल्यांदा:देशातील पहिले पेपरलेस बजेट मेड इन इंडिया टॅबलेटवर वाचण्यात आले; अर्थसंकल्पात पहिल्यांदा कधी काय-काय झाले, येथे वाचा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व खासदारांना इकॉनॉमिक सर्व्हेची सॉफ्ट कॉपी देण्यात आली.

देशातील पहिले पेपरलेस बजेट सादर करण्यात आले आहे. अर्थमंत्र्यांनी याला मेड इन इंडिया टॅबलेटवरुन वाचले. खासदारांनाही हे बजेट त्यांच्या मोबाइलवर मिळाले. तुम्हाला वाचायचे असेल तर यूनियन बजेट अॅपवरुन तुम्ही ते वाचू शकता. मोदी सरकारमध्ये यापूर्वीही अनेक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत.

2020 मध्ये पहिल्यांदा दोन प्रकारे टॅक्स सिस्टम आली, 2019 मध्ये 159 वर्षे जुन्या ब्रीफकेसमध्ये बजेट डॉक्यूमेंट घेऊन जाण्याची परंपरा संपली, 2018 मध्ये पहिल्यांदा देशात बनलेल्या वस्तूंच्या किंमती बजेटनंतर वाढल्या - कमी झाल्या नाहीत, 2017 मध्ये 92 वर्षांत पहिल्यांदा रेल्वे बजेट सादर झाले नाही.

असे अनेक उदाहरण आहेत. जाणून घेऊया या वेळच्या बजेटमध्ये काय नवीन आहे. यासोबतच बजेटमध्ये काय पहिल्यांदा झाले.

पहिल्यांदा पेपरलेस बजेट
ही पहिली वेळ आहे, जेव्हा बजेट पेपर प्रिंट झाले नाही. यापूर्वी वित्त मंत्रालयाच्या प्रेसमध्ये बजेट डॉक्यूमेंट प्रिंट होत होते. जवळपास 100 कर्मचाऱ्यांचा याच्याशी संबंधीत असायचे, जे बजेट डॉक्यूमेंट प्रिंट होणे, सील होणे आणि बजेटच्या दिवशी डिलीव्हरी करेपर्यंत जवळपास 15 सोबत राहत होते.

या दरम्यान हे लोक घरीही जाऊ शकत नव्हते. यांच्याजवळ इंटरनेटचीही सुविधा नसायची आणि मोबाइलही नसायचा. या वर्षी कोरोनामुळे बजेटची सॉफ्ट कॉपी सादर करण्यात आली. शुक्रवारी सर्व खासदारांना इकॉनॉमिक सर्व्हेची सॉफ्ट कॉपी देण्यात आली.

पहिल्यांदा बजेटचे मोबाइल अॅप
बजेटसाठी यूनियन बजेट नावाचे मोबाइल अॅप लॉन्च करण्यात आले. अर्थ मंत्रालयाने 6 जानेवारीला हे अॅप लॉन्च केले. या अॅपवर अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर बजेटसंबंधीत 14 डॉक्यूमेंट खासदार आणि सामान्य लोकांसाठी उपलब्ध आहेत.

मोदी सरकारच्या गेल्या 7 बजेटमध्ये जे पहिल्यांदा झाले
2020: पहिल्यांदा दोन प्रकारच्या टॅक्सची सिस्टम आली

निर्मला सीतारमण यांनी दोन प्रकारच्या कर प्रणालीची घोषणा केली. नवीन पर्यायात गृह कर्ज, पीएफसह सर्व सूट काढून टाकण्यात आल्या. फक्त NPS वर लाभ मिळतो. नवीन कर हा त्यांच्या करिता चांगला आहे जे आयकरच्या व्याप्तीत येऊनही बचत करु शकत नाहीत.

2019: 159 वर्षात प्रथमच बजेट नाही बहीखाता सादर करण्यात आले

जुलै 2019 मध्ये निर्मला सीतारमण अर्थसंकल्प ब्रीफकेससह सभागृहात पोहोचल्या नाहीत. त्यांच्या हातात ब्रिफकेस ऐवजी लाल फोल्डर होते. त्याला अर्थसंकल्पाऐवजी बहीखाता म्हटले गेले. 159 वर्षात प्रथमच अर्थसंकल्पात ब्रीफकेसचा वापर करण्यात आला नाही.

2018: पहिल्यांदा देशात तयार झालेले साहित्य स्वस्त किंवा महाग झाले नाही
1 जुलाई 2017 ला देशात GST लागू झाले. तेव्हापासून देशात बनलेल्या साहित्याची किंमत GST काउंसिल ठरवते. सरकारजवळ बजेटसाठी एक्साइज आणि कस्टम ड्यूटी आहे. आता विदेशातून येणाऱ्या वस्तूंची कस्टम ड्यूटी वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर त्या वस्तूच्या किंमती वाढतात किंवा कमी होतात.

2017: 92 वर्षात पहिल्यांदा रेल्वे बजेट सादर झाले नाही
1924 मध्ये पहिल्यांदा रेल्वे बजेट सादर करण्यात आले नाही. 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेल्वे मंत्री जॉन मथाई यांनी रेल्वे बजेट सादर केले. 1994 मध्ये पहिल्यांदा बजेटचे प्रसररण टीव्हीवर करण्यात आले. 92 वर्षांनंतर 2017 मध्ये पहिल्यांदा रेल्वे बजेट सामान्य बजेटचा भाग झाले.

2017: 1 फेब्रुवारीला बजेट सादर करण्यात आले
पहिल्यांदाच बजेट 1 फेब्रुवारीला सादर करण्यात आले. यापूर्वी निवडणूक वर्ष वगळता सामान्य बजेट फेब्रुवारीच्या लास्ट वर्किंग डेला सादर केले जात होते. निवडणुकीच्या वर्षात अंतरिम बजेट फेब्रुवारीच्या लास्ट वर्किंग डेला सादर केले जात होते. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामान्य बजेट सादर केले जात होते.

2016: पत्रकरांसाठी छापले नाही बजेट
पहिल्यांदा बजेटची हार्डकॉपी पत्रकारांना देण्यात आली नाही. यापूर्वी प्रत्येकवेळी अर्थमंत्री बजेटचे भाषण पूर्ण झाल्यानंतर पत्रकारांना बजेटची कॉपी दिली जात होती. त्यावेळचे मंत्री अरुण जेटली यांनी याला पर्यावरण संवर्धनासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते.

आता मोदी सरकारपूर्वी बजेटमध्ये कोणकोणते बदल झाले ते पाहूया...
1999 : पहिल्यांदा सकाळी 11 वाजता बजेट सादर झाले

27 फेब्रुवारी 1999 रोजी प्रथम सकाळी 11 वाजता बजेट सादर केले गेले. तत्पूर्वी सायंकाळी पाच वाजता सादर केले जात होते. ब्रिटिशांनी ते सुरू केले होते जेणेकरुन यूकेच्या संसदेत बसलेले खासदार ते रेडिओवर ऐकू शकतील. कारण जेव्हा भारतात संध्याकाळी पाच वाजतात तेव्हा ब्रिटनमध्ये सकाळी साडेअकरा वाजतात.

1965: इकॉनॉमिक सर्व्हे बजेटच्या एक दिवसांपूर्वी आला

प्रथमच अर्थसंकल्पा आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले गेले. यापूर्वी अर्थसंकल्पांसह आर्थिक सर्वेक्षणही सादर करण्यात येत होते. याची सुरुवात 1950 मध्ये झाली होती.

1955: पहिल्यांदा बजेट डॉक्यूमेंट्स हिंदीमध्येही छापण्यात आले. यापूर्वी ते फक्त इंग्रजीमध्ये छापले जात होते.

1950: 26 जनवरी 1950 को गणतंत्र की स्थापना के बाद पहला बजट 28 फरवरी 1950 को वित्त मंत्री जॉन मथाई ने पेश किया था।

1950: 26 जानेवारी 1950 नंतर पहिले बजेच 28 फेब्रुवारी 1950 ला अर्थमंत्री जॉन मथाई यांनी सादर केले होते.

26 नोव्हेंबर 1947: स्वातंत्र्यानंतर पहिले बजेट देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षणमुखम चेट्टी यांनी सादर केले होते. हे बजेट 15 ऑगस्ट 1947 ते 31 मार्च 1948 पर्यंतच्या कालावधीसाठी होते.

1947: लियाकत अली खान पहिले भारतीय होते, ज्यांनी भारताच्या अंतरिम सरकारचे बजेट सादर केले होते. विभागणीनंतर लियाकत अली पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. ते अविभाजित भारताचे बजेट सादर करणारे अखेरचे व्यक्तीही बनले होते.

1860: 7 एप्रिल 1860 ला भारताचे पहिले बजेट ब्रिटिश संसदेत स्कॉटिश बिझनेसमन जेम्स विल्सन यांनी सादर केले होते. तेव्हा ते बजेटचे कागदपत्र एका चामडाच्या पिशवीमध्ये घेऊन आले होते.

खरेतर बजेट शब्द फ्रेंच शब्द बूगेट वरुन निघाले आहे. याचा अर्थ - चामड्याची पिशवी असा आहे. बजेट ब्रीफकेसमध्ये आणण्याची पध्दती ब्रिटेनमध्ये सुरू झाली. ब्रिटेनमध्ये एकच बजेट ब्रीफकेसला एक मंत्री दुसऱ्याला सोपवते. तर भारतात अर्थमंत्री वेगवेगळ्या ब्रीफकेसचा वापर करतात.

बातम्या आणखी आहेत...