आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Education Minister Dr. Ramesh Pokhriyal Nishank Gave Instructions To Universities, Give Another Chance To Students Who Failed To Appear In Or Skip The Final Year Exam

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय:परीक्षेत सहभागी होऊ न शकणाऱ्या विद्यार्थांना दुसरी संधी द्या, सरकारचे विद्यापीठांना निर्देश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजीसीने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता सप्टेंबरअखेर परीक्षा घेण्यात येणार आहेत

कॉलेज-विद्यापीठांच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. अशात अंतिम वर्षाच्या परीक्षेंबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परीक्षेत येऊ शकणार नाहीत त्यांना नंतर परीक्षेस हजर राहण्याची संधी द्यावी असे निर्देश मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठांना दिले आहेत. कॉलेज-विद्यापीठांच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि शिक्षकांकडून होणाऱ्या मोठ्या विरोधानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. 

सुविधांच्या आधारे परीक्षांचे नियोजन करा 

पोखरियाल म्हणाले की, विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार या परीक्षा कधीही घेऊ शकतात. यापूर्वी, यूजीसीने देशभरातील पदवीधर आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली होती. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आता सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले होते.

ट्विटरवर दिली माहिती 

केंद्रीय मंत्री यांनी सलग केलेल्या अनेक ट्विटमध्ये म्हटले की, "विद्यापीठाने आयोजित केलेल्या परीक्षेत अंतिम वर्षातील कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे हजर राहू शकला नाही, तर त्याला विशेष परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल."

दिल्लीत सर्व परीक्षा रद्द

अनेक राज्यांनी युसीजीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर पोखरियाल यांनी ट्विटर हँडलवरून अनेक ट्विट केले. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र आणि पंजाबनंतर दिल्लीतही कोरोनोव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.

0