आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank Announces Cancellation Of 75% Marks For JEE Main Examination

विद्यार्थ्यांना दिलासा:JEE मुख्य परीक्षेसाठी बारावीत 75 टक्के गुणांची अट रद्द, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची घोषणा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी जेईईसाठी (JEE) घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. यानुसार, जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए) द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIEST), शिबपूर (पश्चिम बंगाल) आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (सीएफटीआय - आयआयटी वगळता) मध्ये विविध यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. जेईई (ऍडव्हान्स) परीक्षेची तारीख जाहीर करताना, शिक्षणमंत्र्यांनी विद्यर्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी इयत्ता बारावीमध्ये किमान 75 टक्के गुण मिळवण्याची पात्रता निकष शिथिल केल्याचे जाहीर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...