आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Health Minister Dr. Harshvardhan Took Corona Vaccine In Private Hospital; Corona Vaccination Phase 2 Second Day Of Vaccination Of Senior Citizens And Persons With Diseases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य मंत्र्यांनी घेतली लस:डॉ. हर्षवर्धन यांनी खासगी रुग्णालयात 250 रुपये देऊन कोव्हॅक्सीन लस घेतली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'कोरोना लस संजीवनीप्रमाणे काम करेल'

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवशी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लस घेतली. त्यांनी खासगी रुग्णालय दिल्ली हार्ट अँड लंग्स इंस्टीट्यूटमध्ये 250 रुपये देऊन व्हॅक्सीन घेतली. आरोग्य मंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नीनेही लस घेतली.

आरोग्यमंत्र्यांनी ICMR आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा डोस घेतला. लस घेतल्यानंतर ते म्हणाले की, 'ही व्हॅक्सीन संजीवनीप्रमाणे काम करेल. हनुमानाला संजीवनी आण्यासाठी खूप दूर जावे लागले होते, पण ही संजीवनी (व्हॅक्सीन) तुमच्या जवळच्या रुग्णालयात मिळून जाईल.'

दरम्यान, केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील आज कोरोना लस घेतली. त्यांनी पटणा AIIMS मध्ये पहिला डोस घेतला. तर, अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये डालमिया रुग्णालयात लस घेतली.

पहिल्या दिवशी 4 लाखांपेक्षा जास्त जणांनी घेतली लस

देशात कोरोना व्हॅक्सीनेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी Co-Win पोर्टलवर जवळपास 25 लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये 24.5 लाख सामान्य लोक आणि इतर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात 16 जानेवारीला सुरु झालेल्या व्हॅक्सीनेशनच्या 45 व्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 4 लाख 27 हजार 72 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 3 लाख 25 हजार 485 लोकांना पहिला डोज आणि एक लाख एक हजार 587आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोज देण्यात आला.

पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी घेतली लस

दुसर्‍या टप्प्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींना लसी देण्यात आली. मोदी पहाटेच दिल्ली एम्स येथे दाखल झाले आणि त्यांना भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. त्याचवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही या लसीचा पहिला डोस दिला. आता 28 दिवसानंतर त्यांना लसचा दुसरा डोस दिला जाईल.

बातम्या आणखी आहेत...