आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुपकारवर भडकले गृहमंत्री:गुपकारला जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे, देश हे सहन करणार नाही- अमित शाह

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बनलेल्या गुपकार अलायंसवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह मंगळवारी म्हणाले की, 'गुपकार गँग आता ग्लोबल होत आहे. त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे या गुपकार गँगला समर्थन आहे का?', असा सवाल अमित शहा यांनी केला.

शाह पुढे म्हणाले की, 'गुपकार गँग आणि काँग्रेस सोबत मिळून जम्मू-काश्मीरला दहशतवाद आणि अशांततेच्या काळात ढकलू पाहत आहे. कलम 370 रद्द झाल्यामुळे दलित, महिला आणि आदिवासिंना आपला अधिकार मिळाला. काँग्रेस आणि गुपकार गँगला त्यांचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. यामुळेच देशातील नागरिकांनी त्यांना नाकारले आहे.'

देशाविरोधातील आघाडी सहन करणार नाही

गृहमंत्री पुढे म्हणाले की, 'जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटत आहे. भारतातील लोक देशविरोधी आघाडी सहन करणार नाहीत. जर गुपकार गँगने देशाच्या मूडसोबत चालले नाही, तर देशातील लोक त्यांना नष्ट करतील.' अमित शाह यांच्यापूर्वी सोमवारी भाजप प्रवक्ते संबित पात्रा आणि कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन गुपकार अघाडीवर निशाना साधला होता.

काय आहे गुपकार डिक्लरेशन ?

श्रीनगरच्या गुपकार रोडवर नॅशनल कॉन्फ्रेंसचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांचे घर आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 4 ऑगस्ट, 2019 ला आठ स्थानिक दलांनी येथे बैठक घेतली होती. यात एक प्रस्ताव सादर केला होता. त्यालाच गुपकार डिक्लरेशन म्हटले जाते. गुपकार डिक्लरेशनमध्ये आर्टिकल-370 आणि 35-ए ला परत आणण्यासोबत जम्मू-काश्मीरसाठी राज्याचा दर्जा परत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या गुपकार डिक्लरेशनमध्ये डॉ. फारुक अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फ्रेंस, महबूबा मुफ्ती यांची पीडीपी, सज्जाद गनी लोन यांची पीपुल्स कॉन्फ्रेंस, अवामी नॅशनल कॉन्फ्रेंस, जम्मू-काश्मीर पीपुल्स मूवमेंट आणि माकपा सामील आहे.

बातम्या आणखी आहेत...