आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींनी शेतकऱ्यांना ‘मवाली’ संबाेधले, नंतर माघार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या- ते शेतकरी नाहीत, मवाली आहेत. त्यांनी गुन्हे केले आहेत. २६ जानेवारीला जे झाले ते लज्जास्पद होते. गुन्हेगारी कृत्य होते. विरोधकांनी अशा गाेष्टींना प्राेत्साहन दिले.’ त्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, ‘आंदोलन करणारे मवाली नाहीत, अन्नदाते आहेत.’

दरम्यान, वाद वाढताच लेखींनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. तरीही यामुळे शेतकरी दुखावले असतील, तर मी माझे शब्द मागे घेते.’ शेतकऱ्यांनी जंतर-मंतरवर गुरुवारी किसान संसद सुरू केली. तीत लेखींच्या वक्तव्याचा निषेध करणारा ठराव मंजूर झाला.

बातम्या आणखी आहेत...