आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफोर्ब्जच्या जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भारताच्या सहा महिलांचा समावेश आहे. ३६व्या क्रमांकावरील निर्मला सीतारमण यांनी लागोपाठ चौथ्या वर्षी यादीमध्ये स्थान मिळवले आहे. एचसीएल टेकच्या अध्यक्षा रोशनी नाडर मल्होत्रा ५३व्या, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच ५४व्या, स्टील अथॉरिटीच्या अध्यक्षा शोभा मंडल ६७व्या, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार शॉ ७२व्या आणि नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर या ८९व्या क्रमांकावर आहेत.
कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी : यादीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. १०० क्रमांकावर मरणोत्तर इराणच्या महसा अमिनी आहेत.
टाइमच्या मुखपृष्ठावर झेलेन्स्की, ‘पर्सन ऑफ द इयर’ सन्मान न्यूयॉर्क| प्रतिष्ठित टाइम मासिकाने युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्कींना पर्सन ऑफ द इयर घोषित करत आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. टाइमचे म्हणणे आहे की, रशियन हल्ल्यांचा झेलेन्स्की व युक्रेनच्या लोकांनी ज्याप्रकारे सामना केला असे जगात अनेक वर्षांनंतर पाहायला मिळाले आहे. झेलेन्स्की प्रत्येक संकटकाळात आपल्या नागरिकांसोबत ताकदीने उभे राहिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.