आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Minister Nishank Tweeted That The Result Of CBSE 10th Will Be Announced Tomorrow If Not Today

CBSE 10 वी रिजल्ट अपडेट:आज नाही तर उद्या लागणार 10 वीचा निकाल, केंद्रीय मंत्री निशंक यांनी ट्विट करत दिली माहिती 

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सुमारे 18 लाख विद्यार्थी बसले होते.
  • 13 जुलै रोजी मंडळाने 12 वी चा निकाल जाहीर केला, 88.78% विद्यार्थी उत्तीर्ण झाले

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) च्या दहावीचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी 12 वी प्रमाणे अचानक निकाल जाहीर करून धक्कादायक बातमी दिली. यावर आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयल निशंक यांनी ट्विट करून निकालासंदर्भातील परिस्थिती स्पष्ट केली. यानुसार उद्या दहावी सीबीएसईचा निकाल लागणार आहे. 

यासह सीबीएसई प्रवक्त्याने असेही म्हटले आहे की दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही म्हणजे मंगळवार, 14 जुलै ला घोषित केला जाणार नाही. संपूर्ण निकाल उद्या 15 जुलै दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

15 जुलैपर्यंत निकाल जाहीर करावे लागणार 

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीएसईने 15 जुलैपर्यंत मंडळाचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती दिली होती. या अनुक्रमे, 12 वीचा निकाल 13 जुलैला अचानक घोषित करण्यात आला. यानंतर आता विद्यार्थी दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

18 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

यंदाची दहावी आणि बारावीच्या वर्गांची परीक्षा 15 फेब्रुवारी 2020 पासून एकाच वेळी सुरू झाली. यावर्षी दहावीमध्ये सुमारे 18 लाख विद्यार्थी बसले होते. मात्र, कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा 19 मार्च 2020 रोजी पुढे स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी दहावीच्या चार परीक्षांचे चार विषय बाकी होते. त्याचबरोबर ईशान्य दिल्लीतील सुमारे 86 शाळांमधील दहावीच्या परीक्षा 26 फेब्रुवारी 2020 पासूनच स्थिगत करण्यात आल्या होत्या. परंतु, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या.

उद्या असा पाहा रिजल्ट 
सर्वात पहिले CBSE ची ऑफिशियल साइट cbseresults.nic.in वर जा.
येथे होम पेजवर 10वीं CBSE Results 2020 लिंकवर क्लिक करा. 
आता एक नवीन पेज ओपन झाल्यावर उमेदवारांना लॉगइन करायचे आहे.
लॉगइन करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
रिजल्ट पाहिल्यानंतर हे डाऊनलोड करुन हार्ट कॉपी ठेवा.